परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्यावर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी केला हल्ल्याचा प्रयत्न; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

85
परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्यावर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी केला हल्ल्याचा प्रयत्न; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल
परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्यावर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी केला हल्ल्याचा प्रयत्न; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

खलिस्तानवादी दहशतवादी त्यांच्या अतिरेकी कारवायांपासून थांबत नसल्याचे दिसच आहे. खलिस्तानवादी दहशतवादी (Khalistanis terrorists) भारताविरुद्ध सतत कट रचत आहेत. कॅनडा (Canada) असो, ब्रिटन असो किंवा अमेरिका (America) असो, सर्वत्र खलिस्तानवादी दहशतवादी (Khalistanis terrorists) भारतीय समुदायाच्या लोकांना, नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. याठिकाणी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (S. Jaishankar) यांच्या लंडन भेटीदरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

( हेही वाचा : Crime : एनसीबीने २०० कोटींच्या अंमली पदार्थांसह ६ जणांना केली अटक

दरम्यान भारत आणि ब्रिटनकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री आयर्लंडला (Ireland) भेट दिल्यानंतर ब्रिटनला (Britain) पोहोचले. तिथे ते लंडनमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे सर्व ब्रिटिश पोलिसांच्या उपस्थितीत घडले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दि. ६ मार्च रोजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमधील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना, काही खलिस्तानवादी दहशतवादी (Khalistanis terrorists ) लोक त्यांच्या गाडीसमोर आले आणि त्यांनी लंडन पोलिस अधिकाऱ्यांसमोर गाडीवरील भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडले.

यामुळे ब्रिटिश सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी ब्रिटिश समकक्ष डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. यादरम्यान, जागतिक परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध, मुक्त व्यापार करार इत्यादी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. (S. Jaishankar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.