-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात हे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्यावेळी दाखवून दिलं. २६४ धावांचा पाठलाग करताना तो मैदानावर टिकून राहिला. त्याने ८४ धावा केल्या. त्याला पाठलागांचा बादशाह (King) म्हणतात ते का याचं प्रात्यक्षिकच त्याने घालून दिलं. विराटच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) अंतिम फेरीत पोहोचला. आपण दडपणाखाली ही खेळी का करू शकलो, याचं उत्तर खुद्द कोहलीनेच सामन्यानंतर दिलं.
‘मला क्रिकेट हा खेळ अतिशय आवडतो. मला फलंदाजी आवडते. जोपर्यंत हे प्रेम कायम राहिल, तोपर्यंत बाकीच्या गोष्टींतून मार्ग निघतच राहील. तुम्हाला कुठल्याही अतिकठीण प्रसंगात खेळायचं नाही आहे. फक्त संघाची गरज काय आहे हे ओळखून त्याप्रमाणे खेळायचंय. परिस्थिती ओळखून खेळलात, तर आतासारखे विजयी निकाल तुमच्या वाट्याला अधिक प्रमाणात येतील,’ असं विराट (Virat Kohli) म्हणाला.
(हेही वाचा – Conversion: सावत्र मुलाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून वडिलांनीच मुलाला साखळदंडांनी बांधले)
𝙅𝙪𝙨𝙩. 𝘼𝙣𝙤𝙩𝙝𝙚𝙧. 𝘾𝙝𝙖𝙨𝙚 ft. Virat Kohli 😎
We got the chase-master himself to decode #TeamIndia‘s semi-final win over Australia 🫡
WATCH 🎥🔽 – By @mihirlee_58 #INDvAUS | #ChampionsTrophy | @imVkohli
— BCCI (@BCCI) March 5, 2025
क्रिकेटसाठी आपलं प्रेम आणि कारकीर्दीचा हा टप्पा यावरही विराटने (Virat Kohli) भाष्य केलं. ‘कारकीर्दीच्या या टप्प्यावर मला महत्त्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी करायची आहे. सामन्यासाठी तयारी करणं, त्यासाठी मेहनत घेणं, संघाची गरज ओळखून खेळणं, एकेरी धावा पळणं आणि आपलं काम चोख करणं, या गोष्टींत मला आनंद मिळतो,’ असं विराट (Virat Kohli) म्हणाला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाचं श्रेय विराटने सांघिक कामगिरीला दिलं. आणि विराट, राहुल, श्रेयस हे फलंदाज गरज असताना उभे राहिले, असं त्याने सांगितलं. भारतीय संघ आता अंतिम फेरीत ९ मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला ४ दिवसांची विश्रांती मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community