- ऋजुता लुकतुके
स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) चॅम्पियन्स करंडकातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पु्न्हा एकदा आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचांत पोहोचला आहे. तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. अलीकडेच उपान्त्य लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट ९८ चेंडूंत ८४ धावांची खेळी खेळला. तर पाकिस्तानविरुद्घही त्याने नाबाद १०० धावा केल्या होत्या. एकीकडे विराट (Virat Kohli) क्रमवारीतील पायऱ्या चढत असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दोन पायऱ्या खाली उतरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेनही (Heinrich Klaasen) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा उपकर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या तर पाकचा बाबर आझम (Babar Azam) दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.
(हेही वाचा – मुंबईत प्रथमच देशी खेळांसाठी मैदान आरक्षित; मंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा)
🔹Zadran’s big leap 📈
🔹Henry closes in on Theekshana ⚡
🔹New no. 1️⃣ all-rounder 👀Multiple big movers in the latest ICC Men’s ODI Player Rankings from the #ChampionsTrophy action 🏏
More ➡️ https://t.co/TH5UdFLoaK pic.twitter.com/Qj4Jgq2tgb
— ICC (@ICC) March 5, 2025
(हेही वाचा – ‘मेट्रो’चे बॅरिकेड्स लवकरच हटवणार; MMRDA ने सांगितली कामांची स्थिती)
इतर भारतीय खेळाडूंमध्ये अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनीही क्रमवारीत जोरदार मुसंडी मारली आहे. पटेलने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. आणि त्याच्या जोरावर १९४ रेटिंग गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तो तेराव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अष्टपैलूच्या क्रमवारीत एरवी अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं वर्चस्व आहे. अफगाण खेळाडू अझमतुल्ला ओमारझाई आपल्याच संघातील खेळाडू मोहम्मद नबीला मागे सारून अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. ओमारझाईकडे आता २९६ रेटिंग गुण आहेत.
तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) ६०९ रेटिंग गुणांसह अकराव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चॅम्पियन्स करंडकात शमीने आतापर्यंत ८ बळी मिळवले आहेत. आणि तो स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. श्रीलंकेचा महिष थिक्षणा गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर तर आफ्रिकन फिरकीपटू केशव महाराज दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community