Dhananjay Munde यांच्या खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे; मंत्रिपदासाठी पक्षात नेत्यांची रस्सीखेच

41
Dhananjay Munde यांच्या खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे; मंत्रिपदासाठी पक्षात नेत्यांची रस्सीखेच
Dhananjay Munde यांच्या खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे; मंत्रिपदासाठी पक्षात नेत्यांची रस्सीखेच

राज्यमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याची अतिरिक्त जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या खात्याचे नवे मंत्री कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड)

सूत्रांच्या माहितीनुसार, या मंत्रिपदासाठी काही प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल पाटील, प्रकाश सोळंके आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे. भुजबळ यांचा प्रशासनावर चांगला प्रभाव असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. अनिल पाटील (Anil Patil) हे शिंदे-फडणवीस- अजित पवार (Ajit Pawar) सरकारमधील विश्वासू चेहरे म्हणून ओळखले जातात. प्रकाश सोळंके (Prakashdada Solanke) आणि संजय बनसोडे (Sanjay Bansode) हेही या शर्यतीत आहेत.

(हेही वाचा – Crime : एनसीबीने २०० कोटींच्या अंमली पदार्थांसह ६ जणांना केली अटक)

अन्न व नागरी पुरवठा खाते हे थेट जनतेशी संबंधित असल्याने या खात्याच्या नव्या मंत्र्याची निवड महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी आणि राजकीय गणितेही या निर्णयावर परिणाम करू शकतात. अजित पवार (Ajit Pawar) लवकरच अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.