Champions Trophy : सलग दुबईत खेळल्याचा भारतीय संघाला फायदा, शमी सहमत

भारतीय संघ आपले सर्व सामने एकाच जागी खेळत असल्यामुळे या व्यवस्थेवर टीका होत आहे.

46
Champions Trophy : सलग दुबईत खेळल्याचा भारतीय संघाला फायदा, शमी सहमत
Champions Trophy : सलग दुबईत खेळल्याचा भारतीय संघाला फायदा, शमी सहमत
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकासाठी (Champions Trophy) पाकिस्तानला जायला भारतीय संघाने नकार दिल्यावर आयसीसीने (ICC) स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारलं. यात भारतीय संघ आपले सर्व सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर खेळत आहे. तर इतर संघ भारताखेरिज इतर संघांविरुद्धचे सामने पाकिस्तानमध्ये आणि भारताविरुद्धेच सामने दुबईत खेळत आहेत. त्यामुळे इतर संघांचा प्रवासही वाढलाय. शिवाय भारताला एकाच वातावरणात आणि शून्य प्रवासाच्या दगदगीत खेळण्याचा फायदा मिळत आहे. ही व्यवस्था संगनमाताने झाली असली तरी जसजसे सामन्यांचे निकाल येत आहेत, या व्यवस्थेवर टीका होत आहे. अलीकडेच रोहित शर्माने (Rohit Sharma) या टीकेला खरमरीत उत्तर दिलं होतं. ‘दुबई आमचं घरचं मैदान नाही. त्यामुळे आम्हाला फायदा मिळतो, असं म्हणणं चुकीचं आहे,’ असा त्याचा रोख होता.

गंभीरनेही रोहितचीच री ओढली होती. आता भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) एक प्रकारे रोहितच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे. भारताला दुबईत सलग खेळण्याचा फायदा मिळाला आहे, असं शमीने (Mohammed Shami) कबूल केलं आहे. (Champions Trophy)

(हेही वाचा – Raigad पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत असंतोष, आमदारांचा आक्रमक पवित्रा)

‘आम्ही सलग दुबई राहिल्याचा फायदा नक्कीच आम्हाला मिळाला आहे. आम्हाला इथलं वातावरण आता माहीत झालंय. गोलंदाजी कशी करायची याचाही थोडाफार अंदाज आलाय. सगळे सामने एकाच मैदानावर खेळण्याचा वेगळी फायदा आहे,’ असं शमी ऑस्ट्रेलियातील सामन्यानंतर बोलताना म्हणाला.

३४ वर्षीय शमीने (Mohammed Shami) या स्पर्धेत आतापर्यंत ८ बळी मिळवले आहेत. पहिल्या बांगलादेशविरुद्घच्या सामन्यांत त्याने ५ बळी मिळवले. तर उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना ३ बळी मिळवले. शमी मागचं वर्षभर दुखापतीशी झगडत आहे. त्यानंतर पुनरागमन केल्यावर त्याला हळू हळू लय सापडल्याचं दिसत आहे. ‘आता आपण मोठे स्पेल खेळण्यासाठी तयार आहोत,’ असं शमीने (Mohammed Shami) म्हटलं आहे.

तर गंभीरनेही शमीच्या योगदानाचं कौतुक केलं आहे. ‘संघात ४ फिरकीपटू असताना शमीने (Mohammed Shami) बजावलेली भूमिका खूपच मोलाची आहे. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, हेच खरं आहे,’ असं गंभीर शामीविषयी बोलताना म्हणाला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शामीच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना ३०० धावा करण्यापासून रोखलं होतं. (Champions Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.