राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आल्याने सदर जागा रिक्त झाली आहे. या रिक्त पदासाठी पक्षामध्ये इच्छुकांची मोठी रांग लागली असून वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
या जागेसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique), मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांची नावे आघाडीवर आहेत. पक्षाच्या अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक समीकरणांमुळे या तिघांची जोरदार चाचपणी सुरू आहे. (Vidhan Parishad Election)
(हेही वाचा – ठाण्यात उभारणार कन्व्हेंक्शन सेंटर; खासदार Shrikant Shinde यांची माहिती)
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना मुस्लिम समाजाच्या नेतृत्वासाठी प्रोत्साहन दिले जाऊ शकते, तर सिद्धार्थ कांबळे हे मुंबईतील संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांचा राजकीय अनुभव आणि स्पष्टवक्तेपणा पक्षाला विधानपरिषदेत ताकद देऊ शकतो. (Vidhan Parishad Election)
या निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांतर्गत समीकरणांचाही मोठा प्रभाव राहणार आहे. पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Vidhan Parishad Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community