मुंबईत (Mumbai) बाईक टॅक्सीला (Bike Taxi) परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदवार्ता आहे. या सुविधेमुळे मुंबईकरांना वाहतुक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. तसेच बाईक टॅक्सीमुळे (Bike Taxi) तरुणांना मोठा रोजगार मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा: मंत्री Jaykumar Gore यांच्याकडून संजय राऊत, रोहित पवार आणि ‘लयभारी’ यूट्यूब चॅनलवर हक्कभंग)
या बाईक टॅक्सी (Bike Taxi) प्रवासाकरीता एका किलोमीटरसाठी ३ रुपये भाडे हा दर ठरल्याची माहिती समोर येत आहे. बाईक टॅक्सीममध्ये जीपीएस यंत्रणा (GPS System) आवश्यक असेल. बाईकस्वाराच्या पाठी बसणाऱ्यास सुद्धा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीतकमी ५० दुचाकी वाहने असणं आवश्यक आहे. या बाईकच्या नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेटच) पाटी पिवळ्या रंगाची असेल.
तसेच बाईक टॅक्सी (Bike Taxi) चालकाला सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल. पोलिस पडताळणीत करूनच चालक परवाना बॅच मिळणार असल्याचे समोर येत आहे. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी (Bike Taxi) सेवा देणाऱ्या कंपनीस देण्यात येतील. त्याचबरोबर बाईक टॅक्सीमधील (Bike Taxi) दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येणार आहे.
दरम्यान ओला (Ola) , उबेरच्या धरतीवर बाईक टॅक्सीला (Bike Taxi) परवानगी देण्यात आली आहे. तर बाईक टॅक्सीमध्ये (Bike Taxi) महिला सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. बाईक चालकाला पाठीमागे प्रवाशी बसवताना बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असणार आहे. मध्यांतरी बाईक टॅक्सी (Bike Taxi) सेवा रॅपिडोने सुरु केली होती. त्याला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community