-
ऋजुता लुकतुके
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोन भारतीय क्रिकेटचे ब्रँड अँबेसिडर आहेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या पचतिशीतही या दोघांनी आपला दबदबा राखला आहे. दोघांनीही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये दोघांनी खेळावं अशी चर्चा आता सुरू झाली आहे. २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. अशावेळी रोहित (Rohit Sharma) आणि विराटने निदान या ऑलिम्पिकपूरतं टी-२० क्रिकेट खेळावं अशी हाकाटी देशात सुरू झाली आहे.
माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतने एका वृत्त वाहिनीशी बोलताना तशी जाहीर मागणी केली आहे. ‘सगळे विराटबद्दल बोलत आहेत. आणि ऑलिम्पियन विराट (Virat Kohli) तसंच ऑलिम्पियन रोहित (Rohit Sharma) यांनी देशाचं प्रतिनिधित्व करताना ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यासारखी दुसरी गोष्ट नाही,’ असं श्रीसंतने म्हटलं आहे. रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवरही श्रीसंतने भाष्य केलं आहे. (Cricket in 2028 Olympics)
(हेही वाचा – बांगलादेशी रोहिंग्यांना दिले बनावट जन्मदाखले; Kirit Somaiya यांनी पोलिसांना दिले ४६८ पानाचे पुरावे)
‘विराट (Virat Kohli) तर चांगलाच खेळतोय. पण, रोहितच्या (Rohit Sharma) निवृत्तीवर जी चर्चा सुरू आहे ती लोकांनी थांबवावी. आणि बीसीसीआयनेही रोहितला आणखी खेळण्यासाठी राजी करावं. दोघं भारताचे स्टार खेळाडू आहेत. त्यांची कामगिरीही अव्वल अशीच आहे. दोघांनी आणखी खेळत राहिलं पाहिजे,’ असं श्रीसंत (S. Sreesanth) म्हणाला.
सध्याचा भारतीय संघ कुठल्याही संघाला हरवू शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. ‘रविवारी चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) कुठलाही प्रतिस्पर्धी संघ असता तरी चाललं असतं. भारतीय संघ त्यांना हरवून चॅम्पियन्स करंडक जिंकणार आहे. संघाचा विजयाचा धडाकाच तसा आहे. आणि या संघाला सध्या हरवणं कठीण आहे,’ असं श्रीसंत (S. Sreesanth) शेवटी म्हणाला.
२०२८ च्या ऑलिम्पिकचा विराट कोहली (Virat Kohli) हा ब्रँड अँबेसिडर आहे. तेव्हापासूनच तो हे ऑलिम्पिक खेळू शकेल अशी चर्चा सुरू झाली होती. पण, २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेतेपदानंतर विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांनी टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. २०२८ मध्यो रोहित (Rohit Sharma) ४० तर विराट ३९ वर्षांचे असतील. (Cricket in 2028 Olympics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community