The Tariff War : नवीन अमेरिकन शुल्कवाढीतून भारताची होणार सुटका?

भारत आणि अमेरिकेदरम्यान तशी बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे.

51
The Tariff War : नवीन अमेरिकन शुल्कवाढीतून भारताची होणार सुटका?
The Tariff War : नवीन अमेरिकन शुल्कवाढीतून भारताची होणार सुटका?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी २ एप्रिलपासून नवीन शुल्कवाढ लागू करण्याचं सुतोवाच केलं आहे. आणि अलीकडचा ट्रंप यांचा धडाका बघितला तर ते म्हणतात तसं ते करूनही दाखवत आहेत. त्यामुळेच जगात व्यापारी युद्धाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. पण, २ एप्रिलला फुटणाऱ्या बाँबपासून आपली सुटका करून घेण्याची तयारी भारताने चालवली असल्याचं आता दिसतंय. त्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर भारताने वाटाघाटीही सुरू केल्या आहेत. हिंदुस्थान टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे. (The Tariff War)

सध्या भारताचे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) हे सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आणि त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘भारतीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ आणि अमेरिकन शिष्टमंडळ यांच्यात नवीन व्यापारी करारावर बोलणी सुरू आहेत. लवकरच दोघांमधील हा करार प्रत्यक्षात येऊ शकतो,’ असं अमेरिकन सूत्रांनी हिंदुस्थान टाईम्स समुहाशी बोलताना सांगितलं आहे. (The Tariff War)

(हेही वाचा – Yamuna River Cleaning : यमुना नदी स्वच्छता मोहीम सुरू..)

मागच्या महिन्यात १३ तारखेला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनीही प्रस्तावित व्यापारी करारावर बोलणी केली होती. ती बोलणी पुढे नेण्याचंच काम सध्या सुरू आहे. आणि त्यानुसार, अमेरिका व भारतादरम्यान नवीन व्यापारी करार शिशिर ऋतूत प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. (The Tariff War)

दरम्यान डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी दोनच दिवसांपूर्वी नवीन शुल्कवाढ २ एप्रिलला प्रत्यक्षात येईल असं म्हटलं आहे. ही घोषणा करतानाच्या भाषणात त्यांनी भारताचाही उल्लेख केला. युरोपीय आणि आशियाई देश अमेरिकन मालावर पुरेपूर आयात शुल्क लावतात. आता अमेरिकेची वेळ आहे. अमेरिकाही या देशांवर तितकंच शुल्क लावणार, असं ट्रंप (Donald Trump) यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान मोदींना टफ निगोशिएटर म्हटलं होतं. म्हणजे सहजासहजी हार न मानणारा व्यापारी, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावरून भारतावरही शुल्कवाढीचा बडगा उगारला जाणार अशीच शक्यता व्यक्त होत होती. पण, भारताने नवीन व्यापारी धोरणावर आता चर्चा सुरू केल्यामुळे भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय जी उत्पादनं भारतातून सध्या अमेरिकेत जातात, त्यावरही शुल्कवाढीचा प्रस्ताव नाही. फार्मा, कृषिमाल यांचा उल्लेख ट्रंप (Donald Trump)  यांनी भाषणात केलेला नाही. (The Tariff War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.