राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी जे वक्तव्य केले त्यावर विधानसभेत उबाठा गट आक्रमक झाला. आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय भूमिका आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधक आक्रमक झाले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावर सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा यायलाच हवी. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. त्यामुळे ते ऐकून मी त्याच्यावर माहिती घेऊन मी बोलेन. याच्यावर सरकारची भूमिका पक्की आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा बांगलादेशी रोहिंग्यांना दिले बनावट जन्मदाखले; Kirit Somaiya यांनी पोलिसांना दिले ४६८ पानाचे पुरावे)
मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भय्याजी जोशी यांचेही काही दुमत असेल असे मला वाटत नाही. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community