विधानसभेत मराठी भाषेवरून वाद; Aaditya Thackeray आणि नितेश राणे आमनेसामने

84
विधानसभेत मराठी भाषेवरून वाद; Aaditya Thackeray आणि नितेश राणे आमनेसामने
विधानसभेत मराठी भाषेवरून वाद; Aaditya Thackeray आणि नितेश राणे आमनेसामने

महाराष्ट्र विधानसभेत आज मराठी भाषेच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही पक्षांचे आमदार एकमेकांसमोर ठाकल्याने वातावरण तापले आणि अखेर सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

( हेही वाचा : भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर CM Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतरही वादंग

रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांच्या एका वक्तव्यावरून विधानसभेत मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर उत्तर दिले. “मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. मात्र, आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे उत्तर आल्यानंतरही, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र भाजप आमदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे यांनी “मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे आता पुढील कामकाज सुरू होऊ द्या,” असा आग्रह धरला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी फक्त आभार मानायला उभा राहिलो आहे.”

दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा – कामकाज तहकूब

मात्र, यानंतर ठाकरे आणि राणे यांच्यात जोरदार वाद झाला. भाजप सदस्यांनी टोमणे मारल्याने ठाकरे गटाच्या मदतीला वरुण सरदेसाई आणि इतर आमदार धावून आले. तर, भाजपच्या बाजूने नितेश राणे, आशिष शेलार आणि योगेश सागर (Yogesh Sagar) आक्रमक झाले. दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि सभागृहात गोंधळ उडाला. वातावरण तणावपूर्ण झाल्याने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला आणि अखेर सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

मराठी भाषा वादाचा केंद्रबिंदू

मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण नेहमीच तापत असते. यावेळीही विधानसभेत यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला. पुढे सरकार मराठीच्या संवर्धनासाठी कोणते ठोस निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Aaditya Thackeray)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.