‘व्यवहाराची भाषा मराठीच असावी’ Pravin Darekar यांची माहिती

34

मुंबई प्रतिनिधी:

Pravin Darekar : विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान भाजपा गटनेते प्रविण दरेकर (BJP group leader Pravin Darekar) यांनी मराठी भाषेच्या प्रचारासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील व्यवहाराची भाषा मराठीच असली पाहिजे. शिक्षण, प्रशासन, न्यायदान आणि उद्योग क्षेत्रात मराठीचा (Marathi)  वापर अनिवार्य करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. (Pravin Darekar)

(हेही वाचा – भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर CM Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका; म्हणाले…)

कर्नाटकात (Carnatic Language Controversy) एसटी चालकाच्या झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना, मराठी भाषिकांवरील अन्याय महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, तेलंगणाने जिवती तालुक्यातील १४ गावांवर बेकायदेशीर नियंत्रण ठेवल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

राज्याच्या औद्योगिक प्रगतीबाबत बोलताना दरेकर यांनी सांगितले की, दावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) आणि रेवस-रेडी सागरी महामार्गामुळे कोकणाचा विकास वेगाने होईल. तसेच, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील टोल माफ करण्याची मागणीही त्यांनी केली.

(हेही वाचा – Cricket in 2028 Olympics : रोहीत, विराट २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार? बीसीसीआयचं सुतोवाच)

स्वयंपुनर्विकासाला गती देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशीही मागणी त्यांनी केली. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असून, दिवसा वीजपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्प (Solar power plant) उभारले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला घरे उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुकही त्यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.