Sindhudurga येथे लवकरच धावणार एसटी महामंडळाची मिनीबस

52

मुंबई प्रतिनिधी:

Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीस (Public transport) चालना देण्यासाठी लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस (Sindhudurg ST mini buses) सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील काही बसस्थानकांची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार (Msrtc Director Vivek Bhimanwar) यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणे यांनी विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. (Sindhudurga)

(हेही वाचा – विधानसभेत मराठी भाषेवरून वाद; Aaditya Thackeray आणि नितेश राणे आमनेसामने)

या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवेच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील योजनांवर सखोल चर्चा झाली. सिंधुदुर्ग हा पर्यटन (Sindhudurg Tourism) जिल्हा असल्याने येथे अधिक चांगल्या वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे. त्यासाठी मिनी बस सेवा सुरू करणे तातडीचे असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच मिनी बस सेवा कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन दिले.

यासोबतच, पालकमंत्री नितेश राणे (Guardian Minister Nitesh Rane) यांनी जिल्ह्यातील काही बसस्थानकांची दुरवस्था असल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. संबंधित बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून त्यांचे सुशोभीकरण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गावागावांतील संपर्क अधिक सुलभ होण्यासाठी बसेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आणि त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा – पोलिसांच्या गाड्यांना GPS सिस्टीम बसवली)

बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद. हे पद तात्काळ भरावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. सिंधुदुर्गातील (Sindhudurg) नागरिक आणि पर्यटकांसाठी ही योजना लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या नवीन मिनी बस सेवेचा लवकरच शुभारंभ होणार असून, बसस्थानकांच्या दुरुस्तीमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.