मुंबई, विशेष प्रतिनिधी
Madh Island : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पी-उत्तर विभाग हद्दीतील मढ आयलॅण्ड परिसरातील दारणे हाऊस (ख्रिश्चन पाडा) येथील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले. त्यात इमारतीचा तळ मजल्यासह वरील तीन मजल्यांचा समावेश होता. (Madh Island)
पी उत्तर विभागात मढ आयलॅण्ड परिसरात ख्रिश्चन पाडा (Christian pada) भागात एका अनधिकृत इमारतीचे (Unauthorized buildings) पाडकाम करण्यात आले. यामध्ये इमारतीच्या तळ मजल्यासह तीन मजल्यांपर्यंत अनधिकृत करण्यात आले होते. उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार (DCP Vishwas Shankarwar, (Zone 4)) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा – Sindhudurga येथे लवकरच धावणार एसटी महामंडळाची मिनीबस)
या कारवाईसाठी १० कामगार, १० पोलीस, अभियंता, सहायक अभियंते सहभागी झाले होते. तसेच या कारवाईत इमारत आणि कारखाना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच हे ठिकाण दाट लोकवस्तीचे असल्यामुळे आजूबाजूच्या संरचनांना कोणताही धोका होऊ नये याची काळजी यावेळी घेण्यात आली.
हेही पाहा –