मुंबई प्रतिनिधी :
Dr. Shrikant Shinde : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षसंघटना बळकट करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ‘शिवसंवाद दौरा’ (ShivSamvad Doura) करणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबईतील (Mumbai) लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, त्याची सुरुवात ७ मार्च रोजी ईशान्य मुंबई मतदारसंघापासून होणार आहे. (Dr. Shrikant Shinde)
शिवसेनेच्या विजयासाठी रणनीती ठरवणार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) मोठे यश मिळवले. लोकसभेत ७ आणि विधानसभेत ६० आमदार निवडून आले. विशेषतः, मुंबईतील ११ जागांवर उबाठाशी थेट लढत देऊन ६ जागांवर विजय मिळवला. महापालिका निवडणुकीतही मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून महायुतीचा महापौर (Mayor) निवडून आणण्याचा शिवसेनेचा संकल्प आहे.
(हेही वाचा – काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढणार; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही)
७ मार्चला ईशान्य मुंबईतून सुरुवात
खासदार शिंदे ७ मार्चला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
-
१२ वाजता घाटकोपर येथे घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द-शिवाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा.
-
दुपारी २ वाजता भांडूप येथे मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद.
८ आणि ९ मार्चला अन्य मतदारसंघांमध्ये दौरा
-
८ मार्च – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात बैठक
-
९ मार्च – मुंबई दक्षिण मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत चर्चा
(हेही वाचा – गुजरात मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी Pravin Darekar यांच्या अध्यक्षतेखाली समिती; महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा)
शिवसंवाद दौऱ्याचा पक्ष संघटनेला लाभ
यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार शिंदे यांनी राज्यभर ‘जनसंवाद यात्रा’ (Jansamwad Yatra) घेतली होती, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आणि पक्षाला मोठा फायदा झाला. त्याच धर्तीवर हा ‘शिवसंवाद दौरा’ पक्ष विस्तार आणि मजबुतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community