BMC : मुंबईतील मोठ्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाई कामांच्या निविदेतच घोटाळा; मनसेने केली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

194

मुंबई, विशेष प्रतिनिधी

मुंबईतील नालेसफाईच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर तसेच आजवर देण्यात आलेल्या सफाईच्या (Drain cleaning) कामांबाबत मनसेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आता काढण्यात आलेली निविदा रद्द करून या प्रकरणाची एसआयटी (MNS SIT demand) मार्फत चौकशी करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना केली. (BMC)

मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS leader Bala Nandgaonkar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी (Municipal Commissioner Dr. Bhushan Gagrani) यांना निवेदन देवून त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत तसेच मुंबईतील मोठ्या नाल्यातील सफाई कामांच्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप केला. यामध्ये त्यांनी मिठी नदी आणि मोठ्या नाल्यांमधील निविदेमध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा अधिक दराने कामे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून या निविदा रद्द करण्याची मागणी केली.

(हेही वाचा – Matunga रेल्वे स्थानक आणि फुल बाजार परिसरातील ५२ दुकानांवर कारवाई)

या निवेदनामध्ये बाळा नांदगावकर यांनी असे नमुद केले आहे की, हे नालेसफाईचे काम एकाच कंपनीला देण्याचा प्रयत्न असून यात डि बी एंटरप्रायझेसस. एमएम रनोजा डेव्हलपमेंट कार्पौरेशन, त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट आणि तनिषा एंटरप्रायझेस यांनाच काम मिळेल अशाप्रकारचे या निविदेत अट घालण्यात आल्याचे म्हटले आहे. आणि हे सर्व कंत्राटदार अधिक दराने काम मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले  आहे. या पाचही कंपन्या एकाच व्यक्तीच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या असल्याने यात संगनमत झाल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.

(हेही  वाचा – Budget Session : ८ मार्च रोजी सभागृहाची बैठक रद्द; ७ मार्चला होणार महिला सक्षमीकरणावर चर्चा)

मिठी नदीमध्ये (Mithi River) शिल्टपुशर आणि स्टक्चलर आदींचा वापर केला जात असून या मशिनची मक्तेदारी केवळ एकाच कंपनीकडे आहे. या कंपनीला प्रत्येक कामांसाठी दोन वर्षांसाठी ९ कोटी रुपये द्यावे लागते आणि या मशिनची एनओसी ज्यांच्याकडे नसेल त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे या शिल्टपुशर मशिनची अट घालून ठराविक कंपन्यांना काम देण्याचा आणि या मशिनच्या भाड्यापोटी जाणारे पैसे गृहीत धरता महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे केरळमध्ये जी मशिन ९० लाखांमध्ये मिळते, त्याच मशिनचे भाडे तीन विभागांमध्ये  दिल्या जाणाऱ्या कंत्राट कामांमध्ये प्रत्येकी कंत्राटदारांकडून ९ कोटी रुपये घेतले जातात. त्यामुळे या मशिन्स महापालिकेने स्वत: खरेदी करून उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशाप्रकारची मागणीही नांदगावकर यांनी केली आहे. तसेच महापालिकेच्यावतीने मिठी नदीचे काम पाहणारे एक अभियंता हा या संबंधित कंपनीचे भागीदार असल्याचे असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे यासर्व प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करावी तसेच फौजदारी गुन्हेही दाखल करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.