“पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की…” ; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांचे मोठं विधान

132
"पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की..." ; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांचे मोठं विधान

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी “राइज अँड रोल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड” (Rise and Role of India in the World) या लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि काश्मीरशी संबंधित विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत आता फक्त PoK परत मिळण्याची प्रतीक्षा करत आहे, जो पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला आहे. (S. Jaishankar)

काश्मीरमध्ये निवडणुका होणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे
परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत सरकारने काश्मीरच्या (Kashmir) विकासासाठी आणि स्थैर्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. कलम 370 हटवणे, आर्थिक वाढीला चालना देणे, स्थानिक निवडणुका घेणे आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे ही त्यातील प्रमुख पावले आहेत. काश्मीरच्या विकासाबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, “सरकारने बहुतेक समस्या सोडवण्यामध्ये प्रशंसनीय काम केले आहे आणि कलम 370 हटवणे हा यामधील मोठा निर्णय होता.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, काश्मीरमध्ये निवडणुका होणे आणि मोठ्या प्रमाणावर मतदान होणे हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. (S. Jaishankar)

PoK परत मिळवणे गरजेचे
पाकव्याप्त काश्मीरबद्दल परराष्ट्र मंत्र्यांनी (S. Jaishankar) ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “काश्मीरचा प्रश्न भारतात सामील होताच संपतो. काश्मीरचा संपूर्ण प्रश्न सोडवायचा असेल, तर PoK परत मिळवणे गरजेचे आहे.” त्यांच्या या वक्तव्यावरून भारत सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचा पुनरुच्चार झाला आहे. जयशंकर यांनी याआधी 9 मे 2024 रोजीही स्पष्ट केले होते की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो पुन्हा भारतात समाविष्ट करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कटिबद्ध आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले होते की, 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर लोक PoK बाबत अधिक गंभीरपणे विचार करू लागले आहेत. (S. Jaishankar)

ते पुढे म्हणाले, “कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्याआधी विचारपूर्वक आणि धोरणात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. त्यामुळे भारत सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.” (S. Jaishankar)

भारत आणि चीन यांच्यात सहकार्य आणि संघर्ष
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले. त्यांनी नमूद केले की, “भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लोकसंख्येचा आकडा एक अब्जाहून अधिक आहे आणि त्यांचा इतिहासही प्राचीन आणि गुंतागुंतीचा आहे. आज दोन्ही देश वेगाने प्रगती करत आहेत आणि एकमेकांचे शेजारी आहेत.” या संबंधांच्या गुंतागुंतीबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, “जेव्हा एखादा देश वेगाने प्रगती करतो, तेव्हा त्याचे शेजारी आणि जागतिक संबंधांतील संतुलन बदलते. अशा स्थितीत भारत आणि चीन यांच्यात सहकार्य आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत.” (S. Jaishankar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.