Xiaomi 14 : शिओमी कंपनीचा ‘सिनेमॅटिक व्हिजन’ असलेला नवीन स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात

शिओमी कंपनीची १५ सीरिज अलीकडेच लाँच झाली आहे.

50
Xiaomi 14 : शिओमी कंपनीचा ‘सिनेमॅटिक व्हिजन’ असलेला नवीन स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात
Xiaomi 14 : शिओमी कंपनीचा ‘सिनेमॅटिक व्हिजन’ असलेला नवीन स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात
  • ऋजुता लुकतुके

शिआओमी कंपनी (Xiaomi company) सध्या आपली अद्ययावत सीरिज १५ लाँच करण्याच्या तयारीत आहे. जगभरात शिओमी १५ आणि १५ अल्ट्रा हे दोन फोन दाखलही झाले आहेत. भारतासह आणखी काही देशांमध्ये १४ मार्चला हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होतील. या सीरिजची उत्सुकता फोन प्रेमींना आहेच. पण, त्याचवेळी आधीच्या सीरिजमधील शिओमी सिवी या फोनची तरुणांमधील क्रेझही अजून कमी झालेली नाही. सिनेमॅटिक व्हिजन (Cinematic vision) असलेला हा फोन शिओमीचा फ्लॅगशिप फोन आहे. आणि त्यामुळे नवीन सीरिज बाजारात आणतानाही कंपनीने सिवी फोनवरील आपलं लक्ष कमी केलेलं नाही. भारतात ई कॉमर्स वेबसाईटवर कंपनीने सिवी फोनवर विशेष सवलत सुरू केली आहे. त्यामुळे विविध सवलतींचा फायदा घेऊन मूळ ५४,००० रुपये किंमत असलेला हा फोन आता ३९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर ही सवलतीची किंमत ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. शिवाय एक्सचेंज आणि इतर क्रेडिट तसंच डेबिट कार्डांवरील सवलतींमुळे फोनची किंमत आणखी कमी होऊ शकेल. (Xiaomi 14)

(हेही वाचा – खासदार Dr. Shrikant Shinde यांचा ‘शिवसंवाद दौरा’ सुरू; महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष बळकटीसाठी रणनीती)

सिवी हे ‘सिनेमॅटिक व्हिजन’ (Cinematic vision) या शब्दाचं लघुरुप आहे. त्यावरून फोनची खासियतच त्याचा कॅमेरा असल्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल. हिरवा, निळा आणि काळा अशा तीन रंगांत हा फोन उपलब्ध आहे. १२ जीबी रॅम तसंच ५१२ जिबी स्टोरेज या फोनमध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन ६४ टक्के प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेतून तयार करण्यात आला आहे. (Xiaomi 14)

१७७ ग्रॅम वजन असलेल्या या फोनची स्क्रीन क्वाड कर्व्ह डिस्प्ले असलेली आहे. भारतात अशाप्रकारचा हा पहिलाच फोन आहे. स्नॅपड्रॅगन ८ प्रोसेसरच्या तिसऱ्या पिढीचा हा फोन आहे. वेग, शक्ती आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या बाबतीत हा फोन चांगला अनुभव ग्राहकांना देणार आहे. फोनमधील बॅटरी ४,७०० एमएएच क्षमतेची आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर २४ तासांच्या वरही फोन चालू शकतो. फोनबरोबर ६७ किलोवॅटचा फास्टट्रॅक चार्जरही देण्यात येतो. जवळ जवळ ३५ ते ४५ मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होऊ शकतो.

(हेही वाचा – Goregaon Mulund Junction Road प्रकल्पांतर्गत आरेतील बोगद्याचे काम ऑगस्टपासून होणार सुरु)

हा फोन कंपनीने फोटोग्राफी स्मार्टफोन म्हणूनच बाजारात आणला आहे. त्यासाठी फोनमध्ये आहे लिसा समिलक्स लेन्स. आणि ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा. वातावरणातील प्रकाश कसाही असला तरी फोटोतील खरे रंग आणि लुक कायम राहील अशी व्यवस्था फोनमधील सेन्सरमध्ये आहे. शिआओमी १४ (Xiaomi 14) सिव्हीमध्ये ५० मिमीची एक टेलिफोटो लेन्सही आहे. आणि त्याचबरोबर १२ मेगापिक्सेलची एक अल्ट्रावाईड लेन्सही आहे.

लिसा लेन्स तुम्ही पाहिजे तशी सेटही करू शकता. त्यात फोटोग्राफीचे विविध मोडही आहेत. सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सेलचा आहे. यात वाईड लेन्सही आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरातील प्रोग्राम सेल्फी काढताना आजूबाजूच्या सर्वांना स्वत:हून सामावून घेतो. याखेरिज फोटो एडिट करतानाही हा प्रोग्राम तुम्हाला मदत करतो. फोटोतील नको असलेल्या गोष्टी तो काढूनही टाकू शकतो. (Xiaomi 14)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.