Lucknow होणार पहिली एआय सिटी; उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची माहिती

59
Lucknow होणार पहिली एआय सिटी; उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची माहिती
Lucknow होणार पहिली एआय सिटी; उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची माहिती

सध्याचे युग हे एआय (AI) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचे (artificial intelligence) आहे. या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने अनेक आश्चर्यकारक गोष्टी सहजसाध्य करता येतात. ‘एआय’चा (AI) वापर दिवसागणिक वाढत आहे. एआय (AI) मोबाईलचेही युग आले आहे. त्यात शहरं आणि गावं सुद्धा आता मागे राहणार नाहीत. लवकरच देशातील पहिले एआय शहर अस्तित्वात येत आहे. त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालवल्या जातील. हा प्रयोग उत्तर भारतात होत आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना (Suresh Khanna) यांनी राज्याचा अर्थसंकल्प २०२५ सादर केला. राजधानी लखनौ ही देशातील पहिली ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ (Artificial Intelligence City) एआय सिटी) होईल. त्यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे लखनऊ शहरात पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. (Lucknow)

( हेही वाचा : “पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की…” ; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांचे मोठं विधान

बड्या कंपन्यांसाठी एआय (AI) स्टार्टअप्ससाठी पायघड्या घालण्यात येईल. त्यांना एआय सुविधा देण्यात येतील.या कंपन्यांना करात विशेष सवलत देण्यात येतील. त्यांच्यासाठी इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्यात येईल. एआयच्या (AI) माध्यमातून आर्थिक क्षेत्र तयार करण्यात येईल. या शहरात एआय संबंधित शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि विद्यापीठ असेल. त्यामाध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न करण्यात येईल. तर सातत्याने एआयचा (AI) विकास व्हावा यासाठी एआय संमेलन भरवण्यात येतील. सार्वजनिक सेवांसाठी एआयचा वापर करण्यात येईल. नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरूनच अनेक सुविधा एका क्लिकवर मिळतील. केंद्र सरकारने AI मिशनसाठी १० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. २०२४ च्या सुरुवातीलाच देशात जवळपास २४० जनरेटिव AI स्टार्टअप सुरू झाले आहेत. (Lucknow)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.