
-
ऋजुता लुकतुके
आयसीसीने चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) अंतिम फेरीसाठीचे मैदानावरील पंच तसंच तिसरे पंच, सामनाधिकारी यांची यादी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफेल (Paul Reiffel) आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) है मैदानावरील पंच असणार आहेत. तर श्रीलंकेचे रंजन मुदगले हे सामनाधिकारी असतील. जोएल विल्सन (Joel Wilson) हे तिसरे पंच असतील. तर चौथे पंच म्हणून कुमार धर्मसेना यांचं नाव जाहीर झालं आहे. विल्सन टीव्ही रिप्ले पाहून निर्णय देतील. तर मैदानावरील एखादा पंच दुखापतग्रस्त झाल्यास कुमार धर्मसेना त्यांची जागा घेतील. (Champions Trophy, Ind vs NZ Final)
पंच तसंच सामनाधिकारी हे नि:पक्ष असावेत यासाठी बाद फेरीत सर्व संघ निश्चित होत नाहीत तोपर्यंत पंच तसंच सामनाधिकाऱ्यांची निवड होत नाही. आता अंतिम फेरीतील दोन्ही संघ न्यूझीलंड आणि भारत (Ins vs NZ Final) असणार हे निश्चित झाल्यानंतर आयसीसीने पंचांची निवड जाहीर केली आहे. (Champions Trophy, Ins vs NZ Final)
(हेही वाचा – पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार; मंत्री Shivendraraje Bhosale यांचे विधान)
Here are the match officials for the final of Champions Trophy 2025🙌#PaulReiffel #RichardIllingworth #INDvNZ #INDvsNZ #ChampionsTrophy #ChampionsTrophy2025 #Cricket #SBM pic.twitter.com/RL73OdjVX9
— SBM Cricket (@Sbettingmarkets) March 6, 2025
(हेही वाचा – खासदार Dr. Shrikant Shinde यांचा ‘शिवसंवाद दौरा’ सुरू; महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष बळकटीसाठी रणनीती)
५८ वर्षीय पॉल रायफेल (Paul Reiffel) हे ऑस्ट्रेलियाचे माजी तेज गोलंदाज होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत २०० आंतरराष्ट्रीय बळी मिळवले आहेत. पंच म्हणूनही त्यांना चांगला अनुभव आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड या उपान्त्य फेरीच्या सामन्यात त्यांनी पंचाची भूमिका बजावली होती. तर ६१ वर्षीय रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) हे इंग्लंडचे माजी डावखुरे फिरकीपटू आहेत. त्यांना चारवेळा आयसीसीचे वर्षातील सर्वोत्तम पंच होण्याचा मान मिळाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ते पंच होते. तसंच भारत विरुद्ध न्यूझीलंड साखळी सामन्यातही ते पंच होते. यापूर्वी आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही ते अंतिम फेरीत पंच होते. २०१४ च्या टी-२० विश्वचषकातही अंतिम फेरीत इलिंगवर्थच पंच होते. (Champions Trophy, Ind vs NZ Final)
भारतीय संघाने उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला तर न्यूझीलंडने आफ्रिकन संघाला ५० धावांनी हरवत अंतिम फेरी गाठली आहे. चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy) अंतिम सामना येत्या रविवारी ९ तारखेला दुबईत होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community