समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंग्याची भलामण केल्यानंतर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या उबाठा गटाच्या आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी स्वत:ची तुलना धर्मवीर स्वाराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांशी (Chhatrapati Sambhaji Maharaj) केली आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने दि. ७ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.
( हेही वाचा : Volvo XC90 2025 : वॉल्वो फेसलिफ्ट एक्ससी९० कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत?)
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलत असताना आ. अनिल परब (Anil Parab) यांनी, ‘छावा’प्रमाणे मीही अत्याचार भोगले, पण ‘पक्ष’ बदलला नाही, असे विधान केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारमधील सहकाऱ्यांना घेऊन छावा चित्रपट पाहिला. पण राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आढळला नाही. तुम्ही छावा बघता, तर मला पण बघा…, धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj ) छळ झाला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. मी सगळे भोगले, पण पक्ष बदलला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की, लगेच गेले पक्ष सोडून”, असे वादग्रस्त विधान परब (Anil Parab) यांनी केले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वत:ची तुलना केली.
अनिल परब यांची जीभ छाटावी : डॉ. अनिकेतशास्त्री महाराज
अनिल परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिव आणि शंभूप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, राज्यभरातून परबांचा निषेध केला जात आहे. भाजपच्या वतीने दि. ७ मार्च रोजी अनिल परब यांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात मंहत आचार्य पीठाधिश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराजांनी (Dr. Aniket Shastri Maharaj) प्रतिक्रिया देताना सांगितले की, अनिल परबांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही संत समितीच्या वतीने निषेध करतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: ला हिंदुत्ववादी (Hindutva) समजत असतील, तर त्यांनी अनिल परब यांना पक्षातून त्वरित बडतर्फे करावे, अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही. हा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अवमान आहे. खरेच तो स्वत:ची तुलना शंभुराजांशी करत असतील, तर आधी त्यांची जीभ छाटावी, असे अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community