Champions Trophy, Ind vs NZ Final : अंतिम फेरीत पोहोचल्यावर प्रतिस्पर्धी भारताबद्दल मिचेल सँटनर काय म्हणाला?

‘भारताला दुबईची खेळपट्टी माहीत आहे. पण…’असा इशाराच सँटनरने दिला.

108
Champions Trophy, Ind vs NZ Final : अंतिम फेरीत पोहोचल्यावर प्रतिस्पर्धी भारताबद्दल मिचेल सँटनर काय म्हणाला?
Champions Trophy, Ind vs NZ Final : अंतिम फेरीत पोहोचल्यावर प्रतिस्पर्धी भारताबद्दल मिचेल सँटनर काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड संघासाठी या चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy) अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास धकाधकीचा ठरला आहे. म्हणजे मैदानावर त्यांची कामगिरी छान होती. भारत सोडला तर इतर तीनही सामने त्यांनी अगदी आरामात जिंकले. स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाला आव्हान देणारा एकमेव संघ होता तो न्यूझीलंड. पण, धकाधकीचा प्रवास अशासाठी कारण, त्यांचे आतापर्यंतचे ४ सामने हे चार वेगवेगळ्या शहरांत झाले आहेत. पहिले दोन सामने ते रावळपिंडी आणि कराची इथं खेळले. मग भारताविरुद्घच्या सामन्यासाठी ते दुबईला आले. तिथून उपान्त्य सामना खेळण्यासाठी ते पुन्हा लाहोरला गेले. आता अंतिम सामन्यासाठी संघ पुन्हा दुबईत दाखल झाला आहे. ९ तारखेला दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Dubai International Stadium) हा अंतिम सामना होईल.

भारतीय संघ गेले पंधरा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम ठोकून आपले सामने खेळत असताना इतर संघ मात्र आपल्या सामन्यांसाठी धावाधाव करत आहेत. यावरून चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) वेळापत्रकावर टीका होत आहे. भारताने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिल्यावर स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यात आलं. आणि भारताचे सर्व सामने दुबईला हलवण्यात आले. (Champions Trophy, Ind vs NZ Final)

(हेही वाचा – Anil Parab यांच्याकडून स्वत:ची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना; भाजपा ७ मार्चला करणार निषेध आंदोलन)

आणि आता भारतीय संघावर इतर संघातील माजी खेळाडू दुबईत सलग खेळण्याचा फायदा मिळाल्याची टीका करत आहेत. अर्थातच, रोहित आणि गंभीर यांनी ही टीका धुडकावून लावली आहे. ‘दुबई हे काही आमचं घर नव्हे. त्यामुळे मायदेशात खेळल्यासारखा फायदा इथे मिळतच नाही. शिवाय प्रत्येक खेळपट्टी वेगळी होती,’ असं रोहितने बोलून दाखवलं आहे.

या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीसाठी दाखल झालेल्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) इतर गोष्टींकडे लक्ष न देता सामन्याच्या बाबतीत भारताला इशारा दिला आहे. ‘भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळला आहे. त्यामुळे त्यांना इथल्या वातावरणाची, खेळपट्टी जास्त सवय झाली आहे. इथली खेळपट्टी पाकिस्तानपेक्षा काहीशी संथ आहे. पण, आम्ही त्यासाठी तयार आहोत. मूलभूत चांगला खेळ करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असं सँटनरने (Mitchell Santner) आल्या आल्या बोलून दाखवलं.

(हेही वाचा – Madhya Pradesh मध्ये कोळसा खाणीत दबून 3 कामगारांचा मृत्यू !)

या चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) हे दोन्ही संघ साखळी सामन्यांत आमने सामने आले तेव्हा भारताने न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवला. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी होती. वरुण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) ५ गडी बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. पण, इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाला आव्हान देणारा संघ न्यूझीलंडच होता. खासकरून मैदानात चांगले झेल पकडल्यामुळे त्यांनी भारतीय संघाला अडिचशेच्या आतच रोखलं. या कामगिरीपासून प्रेरणा धेणार असल्याचं सँटनरने बोलून दाखवलं आहे.

‘आधीच्या सामन्यापेक्षा नक्कीच चांगला खेळ करण्याचं उद्दिष्टं आम्ही ठेवलं आहे. त्या पराभवानंतर आमची कामगिरी सुधारलेलीही दिसत आहे. तीच गती आता कायम ठेवू,’ असं सँटनर म्हणाला. अंतिम सामना येत्या रविवारी ९ तारखेला दुबईतच होणार आहे. (Champions Trophy, Ind vs NZ Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.