कोट्यवधी भाविकांनी यावेळी महाकुंभ (Mahakumbh) मेळ्यादरम्यान गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान केल्याची आकडेवारी उत्तर प्रदेश (UP) सरकारकडून दिली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात एका चर्चेदम्यान महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh) आर्थिक व्यवहारांबाबतची एक आकडेवारी सादर केली आहे. महाकुंभ मेळ्यात किती मोठ्या प्रमाणावर रोजगार व आर्थिक उत्पन्न वाढलं, यासंदर्भात माहिती देताना योगी आदित्यनाथ यांनी माहरा नावाच्या एका कुटुंबाची गोष्ट सांगितली.
हेही वाचा-गेल्या 10 वर्षांतील विक्रमी गुंतवणूक केवळ 9 महिन्यात ! CM Devendra Fadnavis यांची माहिती
महाकुंभमेळ्याच्या (Mahakumbh) अवघ्या ४५ दिवसांमध्ये या कुटुंबानं तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई केल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या ४५ दिवसांमध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला. यादरम्यान, नद्यांवर फेरी बोटीची सेवा पुरवणाऱ्या माहरा कुटुंबाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी उदाहरणादाखल उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात दिली. या मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजमधील नावाड्यांचं आर्थिक शोषण झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्यावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं. (Mahakumbh)
हेही वाचा-Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास
माहरा कुटुंबाच्या मालकीच्या जवळपास १३० बोटी आहेत. या प्रत्येक बोटीने दिवसाला सरासरी ५० ते ५२ हजारांची कमाई केली. महाकुंभमेळा संपेपर्यंत प्रत्येक बोटीच्या कमाईचा आकडा जवळपास दोन ते अडीच कोटी होता. त्यामुळे माहरा कुटुंबाकडील सर्व बोटींची महाकुंभमेळ्यातील एकूण कमाई जवळपास ३० कोटींच्या घरात गेली, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत दिली. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. (Mahakumbh)
हेही वाचा-Madhya Pradesh मध्ये कोळसा खाणीत दबून 3 कामगारांचा मृत्यू !
महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारनं तब्बल ७ हजार ५०० कोटींचा निधी दिला होता. यात कुंभमेळ्यासाठी लागणारी व्यवस्था, सोयी-सुविधांची उभारणी व इतर बाबींवरील खर्चाचा समावेश होता. पण त्या गुंतवणुकीवर जवळपास ३ लाख कोटींची उलाढाल झाली, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यात हॉटेल उद्योग (४० हजार कोटी), अन्नपदार्थ व इतर दैनंदिन वस्तूंचे उद्योग (३३ हजार कोटी) आणि वाहतूक व्यवसाय (१.५ लाख कोटी) या तीन उद्योगांना सर्वाधिक फायदा झाला, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. (Mahakumbh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community