- मुंबई प्रतिनिधी
भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना भारतरत्न (Bharat Ratna) प्रदान करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय १०० आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. आज या १०० आमदारांच्या सह्यांचे पत्र विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनाने या विषयावर केंद्र सरकारकडे आग्रह धरावा आणि अधिकृत शिफारस करावी, अशी विनंती मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.
(हेही वाचा – गेल्या 10 वर्षांतील विक्रमी गुंतवणूक केवळ 9 महिन्यात ! CM Devendra Fadnavis यांची माहिती)
यासोबतच, त्यांनी या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्रही पाठवले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून, त्यांच्या योगदानाला सर्वोच्च सन्मान मिळावा, अशी भावना आमदारांनी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षांमधील मतभेद बाजूला ठेवून या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार एकत्र आल्याने या प्रस्तावाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. आता राज्य शासन केंद्र सरकारकडे अधिकृतरित्या शिफारस करत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community