जनतेने विरोधी पक्षावर नाही, महायुतीवर विश्वास ठेवला; आमदार Pravin Darekar यांचे विधान

57
जनतेने विरोधी पक्षावर नाही, महायुतीवर विश्वास ठेवला; आमदार Pravin Darekar यांचे विधान
  • प्रतिनिधी

महायुती सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करणार नाही, असे सांगून विरोधी पक्षाने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुज्ञ जनतेने विरोधी पक्षावर विश्वास न ठेवता महायुतीला कौल दिला आणि आज सरकार आश्वासने पूर्ण करत आहे, असा विश्वास विधान परिषदेतील भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला.

पुरवणी मागण्यांवर महायुतीचा ठाम विश्वास

शुक्रवारी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या चर्चेत भाग घेताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, शेतकरी, महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि पायाभूत विकासासाठी महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करत आहे. अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सरकारला धाडसी निर्णय घ्यावे लागत असून भविष्यात या निर्णयांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि उत्पन्न वाढलेले दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याची सभागृहाला माहिती न देता घोषणा; विरोधकांचा तीव्र आक्षेप, सभात्याग)

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी एथिकल हॅकर्सना प्रोत्साहन द्या

दरेकर (Pravin Darekar) यांनी सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करत सरकारने या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एथिकल हॅकर्सच्या विशेष टीम्स तयार करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “अमेरिकेत एका १२ वर्षीय मुलाने नासाच्या अण्वस्त्र प्रणालीत हस्तक्षेप केला होता, तर महाराष्ट्रातच हजारो कोटी रुपयांची फसवणूक सायबर गुन्हेगारांनी केली आहे.” यावर तोडगा म्हणून, राज्य सरकारने सायबर सुरक्षा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावा आणि एथिकल हॅकर्सच्या मदतीने सायबर गुन्हेगारांवर नजर ठेवावी, असेही त्यांनी सुचवले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सावकारी प्रकरणे निकाली काढा

शेतकऱ्यांना पीककर्ज मिळते, मात्र इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी ते सावकारांकडे जावे लागते, त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि आत्महत्या कराव्या लागतात. हे थांबवण्यासाठी सरकारने सावकारी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

(हेही वाचा – महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा पारित करा ; Udayanraje Bhosale यांची मागणी)

कोविड योद्ध्यांना आर्थिक मदत दिल्याबद्दल सरकारचे आभार

कोरोनाकाळात सेवा बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या महापालिका आणि नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल दरेकर (Pravin Darekar) यांनी सरकारचे आभार मानले.

बोरिवली नॅशनल पार्क आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठी विशेष बैठक घ्या

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १३-१४ आदिवासी पाडे असून तेथील रहिवाशांना नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे या भागातील एसआरए प्रकल्पांना अधिक एफएसआय देऊन आदिवासींचे पुनर्वसन करावे, तसेच परिसरातील झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्वसन योजना आखावी, अशी मागणी दरेकर (Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

(हेही वाचा – पन्हाळागड होणार शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा)

कोकणातील अनधिकृत मासेमारीवर कारवाई करा

कोकणात गुजरात आणि कर्नाटकातील पर्ससीन ट्रॉलर्सद्वारे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मासेमारी केली जात आहे, याकडे लक्ष वेधून दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, १ जानेवारी ते ३१ मे या काळात पर्ससीन आणि एलईडी मासेमारीवर बंदी आहे, मात्र ती काटेकोरपणे पाळली जात नाही. यासाठी मत्स्य विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त गस्ती नौका तैनात कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली.

चांभारगड किल्ल्याला “क” गट तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या

रायगड जिल्ह्यातील चांभारगड किल्ला हा चर्मकार समाजाच्या ऐतिहासिक पराक्रमाचे प्रतीक आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक येतात. त्यामुळे या किल्ल्याला ‘क’ गट तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीने रोजा न ठेवल्याबद्दल होतेय टीका; माधवी लतांनी मौलानाला झापले)

नार-पार नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांबाबत बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “नार-पार नदीजोड प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे.” याशिवाय, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आणि नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पालाही गती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

महायुती सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे

शेवटी, महायुती सरकार फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे, असे सांगत राज्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.