Aurangzeb च्या नावे भरणाऱ्या उरसावर बंदीची मागणी

89
Aurangzeb च्या नावे भरणाऱ्या उरसावर बंदीची मागणी
Aurangzeb च्या नावे भरणाऱ्या उरसावर बंदीची मागणी

औरंगजेबाचे (Aurangzeb) उदात्तीकरण थांबवून त्याच्या नावाने भरणाऱ्या उरसावर ताबडतोब बंदी घाला, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ११ मार्च रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Sambhajinagar District Collector’s Office) निदर्शने करण्यात येणार असल्याचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी दि. ६ मार्च रोजी केली.

( हेही वाचा : Vinesh Phogat : विनेश फोगाटने दिली ‘गुड न्यूज’, आई होणार असल्याची दिली बातमी  )

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर (Chhatrapati Sambhaji Maharaj) अगणित अत्याचार व छळ करून हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीमध्ये करण्यात आलेले आहे. मजार मोगल सम्राट शहनशा हजरत औरंगजेब आलमगीर या नावाने बेकायदेशीर उभारलेल्या दर्ग्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उरूस भरवला जातो. या उरसाच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना व शाळांना सुटी दिली जाते. त्यामुळे हा उरूस धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे. त्यामुळे क्रूर औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Sambhajinagar District Collector’s Office) औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार आहे.

दरम्यान औरंगजेबाचे (Aurangzeb) उदात्तीकरण थांबवण्यासाठी शिवभक्त आणि राष्ट्रभक्त लोकांनी सामील व्हावे, असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव (Sanjay Jadhav), जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील आदींनी केले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.