महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन

विरोधकांनी जनतेच्या कामांत राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

63
महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर, समाधानकारक आणि सुरक्षित व्हावे. उद्योगांचा विस्तार व्हावा. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहिणी, तरुण आणि ज्येष्ठ यांना समृद्धीचा अनुभव यावा. सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

नव्या सरकारच्या वेगवान विकासदृष्टीचा संकल्प

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या अर्थसंकल्पात याचे प्रतिबिंब दिसेल. आम्ही दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने राज्याचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने ऐतिहासिक विकासकामे आणि कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या बहुमतामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगाटने दिली ‘गुड न्यूज’, आई होणार असल्याची दिली बातमी)

मराठी अभिमान आणि विकासाचे नवे पर्व

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री (DCM Eknath Shinde) म्हणाले, आमच्या हृदयात मराठी आहे, आमच्या नसानसात मराठी आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी अपप्रचार केला असून, कोणत्याही पात्र बहिणीला अपात्र ठरवले जाणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत गैरसमज दूर

वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अत्यंत महत्त्वाच्या आहेत, परंतु विरोधकांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. महाराष्ट्रातील दर इतर राज्यांपेक्षा अधिक नाहीत आणि ते जीएसटीसह निश्चित करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – …अबू आझमींना भीती का वाटत नाही?; आमदार Sanjay Upadhyay यांचा विधानसभेत आक्रमक पवित्रा)

शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) व्यक्त केला.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

उद्योगवाढीबाबतच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या नऊ महिन्यांत झाली आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत राज्यात १,३९,४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे. दावोस परिषदेतील ८०% सामंजस्य करारांची अंमलबजावणी सुरू आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४% असून, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक एकवर आहे.

(हेही वाचा – Nitesh Rane Vs Rohit Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांवर राजकारण; सभागृहात नितेश राणे-रोहित पवार भिडले)

रस्ते आणि महामार्गांच्या विकासाला गती

राज्याच्या प्रगतीसाठी मजबूत रस्ते आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी माहिती दिली की, समृद्धी महामार्ग सुरू केल्यामुळे त्याचे फायदे आता दिसत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांमधून जोडला जाणार असून, तो कोकण द्रुतगती महामार्गाशी जोडला जाईल. राज्यभर ७,४८० किमी सिमेंट रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे आणि शेतीसाठी भरीव मदत

सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने नवीन धोरण तयार केले आहे. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या सरकारने मोठे निर्णय घेतले असून, गेल्या अडीच वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १६,००० कोटींपेक्षा जास्त मदत दिली आहे.

महायुती सरकारची विकासगती अबाधित राहणार

गेली दहा वर्षे देशाची विकासयात्रा जोमाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र नवी आव्हाने पेलत आहेत. महायुती सरकारने विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक ठेवला असून, हा वेग यापुढेही कायम राहील, असे सांगून महाराष्ट्राच्या विकास यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.