राज्यात बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi infiltrators) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दि. ७ मार्च रोजी बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ‘एक्स’ पोस्टवर लिहले की, आता कळवण आणि नाशिकमध्येही (Nashik) बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators) लाभार्थी! गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’त (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) १८१ बोगस बांगलादेशी लाभार्थी असल्याची माहिती आहे, असे सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले. तसेच ते दुपारी १२ च्या आसपास कळवण आणि ४ वाजता नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचीही ते भेट घेणार असल्याचे सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.
( हेही वाचा : FIFA World Cup 2030 : फिफा विश्वचषकात ६४ संघ खेळवण्याचा फिफाचा विचार)
दरम्यान किरीट सोमय्या यांनी बोगस लाभार्थ्यांची यादी देखील पोस्ट केली आहे. मौजे भादवण येथे १८१ बोगस लाभार्थी निर्दशनास आले असून ते सर्व मुस्लीम समाजाचे असून भादवण गावात आजपर्यंत एकही मुस्लिम कुटुंब अस्तित्वात नाही. तसेच यादीतील १८१ लाभार्थ्यांचा भादवण गावाशी संबंध नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) लाभ घेत आहेत. याची सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
आत्ता बांगलादेशी लाभार्थी!?
आज कळवण आणि नाशिक दौरा
गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे “प्रधानमंत्री किसान सम्मान निधि” योजना मध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी
सकाळी 12 वाजता कळवण (नाशिक जिल्हा) आणि 4 वाजता नाशिक@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/X6mYPwaPRw
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 7, 2025
तसेच अमरावती महापालिका (Amravati Municipal Corporation) हद्दीत तब्बल साडेचार हजार बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. यासंदर्भातील कागदपत्रेही त्यांनी गाडगेनगर पोलिसांना सोपविली आहेत. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा देखील केली. यावेळी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ४६८ पानांचे पुरावे पोलिसांना दिले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community