-
सुजित महामुलकर
शनिवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी एक दिवस आधीच आनंदाची बातमी मिळाली आहे. २०२६ या वर्षात साठी ओलांडलेल्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक असेल, अशी प्रक्षेपित आकडेवारी ताज्या २०२४-२५ या वर्षांच्या महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली आहे. (Maharashtra Economic Survey)
वयोगट-लिंगानुसार प्रक्षेपित लोकसंख्या
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी, ७ मार्च २०२५ या दिवशी विधानसभेत महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ सादर केला. या अहवालात २०२६ या वर्षाची वयोगट आणि लिंगनुसार राज्याची प्रक्षेपित लोकसंख्या दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार २०२६ मध्ये ६० वर्षावरील पुरुषांची संख्या ८२ लाख असेल तर महिलांची संख्या ८८ लाख असेल असे या पाहणी अहवालात म्हटले आहे. (Maharashtra Economic Survey)
(हेही वाचा – DCM Eknath Shinde यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदांवर बदल)
१२.९६ कोटी पर्यंत वाढेल
या प्रक्षेपीत लोकसंख्येनुसार राज्याची एकूण लोकसंख्या १२ कोटी ९६ लाख इतकी असेल. देशात शेवटची जनगणना २०११ या वर्षात झाली होती. त्यानुसार राज्याची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी होती. ती २०२१ मध्ये १२.४४ कोटी झाली तर २०२६ मध्ये १२.९६ कोटी पर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Economic Survey)
सर्वाधिक लोकसंख्या ३०-५९
वयोमानानुसार अपेक्षित आकडेवारीत एकूण लोकसंख्येनुसार पुरुषांची संख्या ६.७३ कोटी असेल तर महिलांची एकूण संख्या ६.२० कोटी असेल. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ३० ते ५९ या वयोगटातील ५.५४ कोटी इतकी असेल. त्या खालोखाल ३.१६ कोटी लोकसंख्या १५-२९ या वयोगटातील असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Economic Survey)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community