माजी आमदार Sanjay Kadam यांची उबाठाने केली हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

85

Sanjay Kadam : शिवसेना उबाठाला (Shiv Sena Thackeray Group) राज्यात धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना उबाठाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठाचे माजी आमदार संजय कदम (Former MLA Sanjay Kadam) हे शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे. (Sanjay Kadam)

मिळालेल्या माहीतीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याचे खेड, गुहागर, दापोली, मंडणगड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच शिवसेना उबाठा मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रक जारी करत ही माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Davis Cup Tennis : डेव्हिस चषकाच्या जागतिक लढतीत भारताचा मुकाबला स्वित्झर्लंडशी)

कोकणात ठाकरेंकडे भास्कर जाधव सोडता आता कोणताही मोठा चेहरा राहिला नाही
उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) उरलेसुरलेल शिलेदार त्यांना सोडून जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात संजय कदम आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात वाद झाले आहे. मात्र, आता ते देखील दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. संजय कदम यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानं रामदास कदम आणि त्यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे. सध्या कोकणचा (Shivsena) विचार करता ठाकरेंकडे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) सोडता आता कोणताही मोठा चेहरा राहिला नाही. त्यामुळे कोकणात शिवसेना उबाठाची ताकद कमी होत असल्याचे बोललं जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.