-
खास प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन सावरकर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी जोरदार मागणी उत्तर मुंबईतील भाजपाचे आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना संजय उपाध्याय यांनी विविध मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. आपल्या पहिल्याच भाषणात उपाध्याय यांनी प्रभावीपणे आपली मते व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांना अद्याप भारत सरकारने ‘भारतरत्न’ दिला नाही याबद्दल खेद व्यक्त करत राज्य शासनाकडून यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी उपाध्याय यांनी केली.
(हेही वाचा – माजी आमदार Sanjay Kadam यांची उबाठाने केली हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका)
‘आरएसएस’चा गौरव करा
उपाध्याय यांनी पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची आठवण शासनाला करून दिली. देशात कोणत्याही आपत्तीच्या वेळी पुढे येऊन मदत करणाऱ्या आणि कुठेही त्याची प्रसिध्द्धी न मिळवणाऱ्या ‘आरएसएस’चे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त ‘आरएसएस’ या महान संस्थेचा राज्य शासनाने गौरव करावा, अशी मागणीही उपाध्याय यांनी फडणवीस सरकारकडे केली.
(हेही वाचा – Davis Cup Tennis : डेव्हिस चषकाच्या जागतिक लढतीत भारताचा मुकाबला स्वित्झर्लंडशी)
UDID उपलब्ध करा
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यथाही भाजपा आमदार उपाध्याय यांनी शासन दरबारी मांडल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन स्तरावर ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID) मिळवण्यासाठी खेटे मारावे लागतात. याची दखल घेऊन शासनाने दिव्यांग शाळेत किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडे जावून ओळखपत्रे वितरित करावे आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी तिसरी महत्त्वाची मागणी उपाध्याय यांनी विधानसभेत केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community