higher secondary education गळतीचे प्रमाण मुंबईत साडेपाच टक्के; बीड मध्ये शून्य!

46

सुजित महामुलकर

higher secondary education: गेले काही महिने बीड जिल्हा (Beed district) गुंडगिरीच्या घटनांनी सातत्याने  चर्चेत राहिला आहे. मात्र, राज्य शासनाने शुक्रवारी ७ मार्च २०२५ या दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (hooliganism economic survey report) सादर केला त्यात काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (higher secondary education)

(हेही वाचा – Aurangzeb च्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी हात आखडता)

मुंबई, पुण्यालाही मागे टाकले
उच्च माध्यमिक (higher secondary) स्तरावर होणाऱ्या शैक्षणिक गळतीच्या (drop out) प्रमाणात बीड जिल्ह्याने मुंबई (Mumbai), पुण्यालाही (Pune) मागे टाकले आहे. ११ आणि १२ वी चे गळतीचे प्रमाण बीड (Beed district), परभणी (Parbhani) या जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

२०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल
२०२३-२४ या शैक्षणिक (education) वर्षाची ११-१२ वी ची आकडेवारी राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी २०२४-२५ च्या अहवालात देण्यात आली आहे. हा अहवाल शुक्रवारी ७ मार्च २०२५ या दिवशी अर्थ मंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी विधानसभेत मांडला.

(हेही वाचा – ‘स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा टोला)

ठाण्यात ७.५ टक्के
उच्च माध्यमिक (higher secondary education) स्तर म्हणजेच ११-१२ वी मधील गळतीचे प्रमाण मुंबई आणि उपनगरात ५.४ टक्के आहे तर हेच पुण्यातील प्रमाण ५.२ टक्के आहे. ठाण्यात  (Thane) ७.५ टक्के विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण आहे तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये (Nagpur) ११-१२ वीचे गळतीचे प्रमाण २.२ टक्के आहे. मात्र बीड, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नंदुरबार आणि परभणी (Parbhani) या जिल्ह्यांमध्ये हेच गळतीचे प्रमाण शून्य आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.