-
प्रतिनिधी
देशात बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसडीपीआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष एम. के. फैजी यांच्या अटकेनंतर ईडीने (ED) देशभरात असलेल्या एसडीपीआय या संघटनेच्या कार्यालयात छापेमारी सुरू केली आहे. गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एसडीपीआय कार्यालयात ईडीने छापा टाकून काही कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली आहे.
ईडी (ED) या आर्थिक तपास यंत्रणेने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, कौसा परिसर, केरळमधील तिरुवनंतपुरम आणि मलप्पुरम, बेंगळुरू, आंध्र प्रदेशातील नंदयाल, चेन्नई, झारखंडमधील पाकूर, कोलकाता, लखनऊ आणि जयपूर यासह १२ ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की एसडीपीच्या राष्ट्रीय मुख्यालयात आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले.
(हेही वाचा – BMC : माटुंग्यातील फुलविक्रेत्यांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई)
एसडीपीआय आणि बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) यांच्यात “आर्थिक संबंध” असल्याचा आरोप यंत्रणेने यापूर्वी केल्यानंतर ईडीची (ED) ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशयावरून पीएफआयला बेकायदेशीर संघटना घोषित केले होते. ईडीने आरोप केला आहे की पीएफआय भारतात देशविरोधी आणि दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये गुंतलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील कौसा येथील एसडीपीआय कार्यालयात शोध मोहिमेदरम्यान, एसडीपीआय आयोजित केलेल्या मोर्चे आणि निदर्शनांसह किती कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच या कार्यक्रमांसाठी किती निधी जमा झाला आहे याची माहिती ईडीकडून (ED) घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी एसडीपीआयच्या दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहारांची माहिती देखील मागितली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community