पुणे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुण्यातील सांगवी पोलीस स्टेशन मधील ४ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली आहे. सांगवी पोलीस ठाण्यासमोर (Sangvi Police Station) ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करून रील व्हायरल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police Suspended)
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. ज्यांचा वाढदिवस होता, ते पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – एसडीपीआयच्या मुंब्रा येथील कार्यालयावर ED ची छापेमारी)
आकाशात भुईनळ; ड्रोनद्वारे चित्रीकरण
बुधवार, ५ मार्चच्या रात्री १२ वाजता गुरुवार सुरू होण्याच्या वेळी सांगवीतील पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रवीण पाटील यांची मित्र मंडळी जमा झाली होती. त्यात पोलीस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता, असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते. या वेळी सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला ‘दादा’ लिहिलेला दुमजली केक कापण्यात आला. (birthday celebration) त्या वेळी इतरांच्या हातात फायर गन, स्काय शॉट होते. रस्त्यातच फटाक्यांची आतिषबाजी केली. आकाशात भुईनळ, या जल्लोषाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले. पुष्पा (Pushpa) चित्रपटातील “अब दिख रहा हूं ना मै जैसा दिखाना चाहिए वैसा. हरगीज झुकेगा नही साला … ” या डायलॉगवर रील केली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
मात्र, व्हिडीओ सर्वत्र पसरल्या नंतर सर्व सामान्य नागरिकांकडून टीका होत आहे. हे व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांपर्यंत पोहचले. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांनी याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची पोलीस नियंत्रण कक्षाला बदली केली. तसेच बर्थ डे बॉय प्रवीण पाटील याच्यासह त्यात सहभागी झालेले पोलीस अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. (Pune Police Suspended)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community