राज्याच्या समृद्ध वारशात महिलांचे मोठे योगदान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या Women’s Day च्या शुभेच्छा

56

स्त्री म्हणजे वात्सल्य, मांगल्य, मातृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशात महिलांचे योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्यलढा असो किंवा सामाजिक सुधारणा, महिलांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत केले.

जागतिक महिला दिनाच्या (Women’s Day) निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महिला सशक्तीकरण (Women Empowerment) आणि त्यांच्या योगदानावर भाष्य करताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. महिला सशक्तीकरणाच्या अनुषंगाने बोलताना शिंदे यांनी सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि महिलांसाठी राबवलेल्या योजनांवर प्रकाश टाकला.

(हेही वाचा – India-Pakistan Railway Track वर सापडला हँड ग्रेनेड; सुरक्षा यंत्रणा सतर्क)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श शासक होते, तसेच अहिल्याबाई होळकर या महिला राज्यकर्त्यांमध्ये सर्वोत्तम होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत रस्ते, पूल, विहिरी आणि तलाव यांसारखी विकासकामे केली आणि जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिला वर्ष, महिला दशक आणि महिला शतक साजरे करण्याची आवश्यकता आहे. महिलांचे योगदान हा केवळ एका दिवसाचा विषय नाही. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना सतत प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आईच्या नावाचा सन्मान – ऐतिहासिक निर्णय

महिला सन्मानाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत सरकारने व्यक्तीच्या नावाच्या पुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला दिलेली खरी दाद आहे. समाजात स्त्रीचा सन्मान वाढवण्यासाठी आणि मातृत्वाला योग्य मान्यता देण्यासाठी हा मोठा बदल ठरणार आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.

“महिला सबलीकरणाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. महिलांसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षितता यासारख्या क्षेत्रांमध्ये सरकार अधिक कार्यरत आहे. महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.

  हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.