९ ते १५ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या Cancer वरील लस मिळणार मोफत

69

मुंबई प्रतिनिधी:
Cancer : राज्यातील ९ ते १५ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या (Cervical cancer) प्रतिबंधासाठी मोफत लस (Free cervical cancer vaccine) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुमारे २,२०० रुपये किमतीची ही लस राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Health Minister Prakash Abitkar) यांनी विधान परिषदेत दिली. (Cancer)

कर्करोग जनजागृतीसाठी विशेष मोहिम
यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पॉपुलेशन बेस्ड कॅन्सर (Population Based Cancer) आणि जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात महिला आरोग्य तपासणी आणि कर्करोग प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

(हेही वाचा – India-Pakistan Railway Track वर सापडला हँड ग्रेनेड; सुरक्षा यंत्रणा सतर्क)

महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक
विधान परिषदेत आमदार चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी राज्यातील स्त्रियांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, दरवर्षी भारतात सुमारे १.६ लाख महिलांना कर्करोगाचे निदान होते, त्यातील ८० हजार महिलांचा मृत्यू होतो. शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समुपदेशन आणि जनजागृती वाढवण्याची नितांत गरज आहे.

महिला आरोग्यासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचाराची मागणी
चित्रा वाघ यांनी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महिला स्वच्छतागृहांचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी कर्करोगावरील औषधे व मॅमोग्राफी तपासणी मोफत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. या मुद्द्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उमा खापरे, मनीषा कायंदे आणि प्रज्ञा सातव यांनीही पाठिंबा दर्शवला.

(हेही वाचा – Pune Police Suspended : पुण्यात चार पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; वाढदिवसाचे ‘पुष्पा’स्टाईल सेलिब्रेशन भोवले )

२ कोटी महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत २ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यात ४३,६३५ महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले, तर ८९२ महिलांना अन्य प्रकारचा कर्करोग असल्याचे आढळले.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील मोफत लसीकरणाचा निर्णय
महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या घटनांमुळे सरकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लसीकरण मोफत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ९ ते १५ वयोगटातील मुलींना ही लस मोफत देण्यात येईल. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार आर्थिक नियोजन करून अंतिम निर्णय घेतील, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Mithi River च्या सफाईवर ड्रोनच्या माध्यमातून ठेवणार लक्ष)

कर्करोग रोखण्यासाठी सरकारचे पुढील पाऊल
महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून त्यावर वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. यासाठी सरकार लसीकरणाबरोबरच समुपदेशन आणि जनजागृतीवर भर देणार आहे, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो मुलींना लाभ होणार असून, कर्करोग प्रतिबंधासाठी ही महत्वपूर्ण पायरी ठरणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.