Mumbai Local Mega Block: मुंबईकरांचे ‘लोकल’ हाल २ दिवसांचा विशेष ब्लॉक, वाहतुकीत अनेक बदल; वाचा वेळापत्रक

202

मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकल रेल्वेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकावर उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लाॅक (Special traffic block) घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक शनिवारी, रविवारी तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळपासून या ब्लाॅकला सुरुवात होईल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. तसेच कसारा (Kasara mega block) येथे येणाऱ्या लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहे. सध्या लग्नसराईचे दिवस चालू असून, मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. (Mumbai Local Mega Block)

मध्य रेल्वे (Central Railway local mega block) मार्गावर पहिला ब्लॉक ८ मार्चला म्हणजे शनिवारी सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर असणार आहे. तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक ९ मार्च म्हणजे रविवार सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत आणि दुपारी ४ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.२५ वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Protein In One Egg : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! अहो पण, एका अंड्यामध्ये किती ग्रॅम प्रोटिन्स असतात?)

कसारा येथून शनिवार आणि रविवार सकाळी ११.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटेल. कसारा येथून रविवारी ४.१६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटेल. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.