Champions Trophy Final : सुनील गावसकरांना चिंता रोहितच्या २५-३५ धावांमध्ये बाद होण्याची

रोहितने मैदानावर टिकून राहावं असा सल्ला गावसकरांनी दिला आहे.

55
Champions Trophy Final : सुनील गावसकरांना चिंता रोहितच्या २५-३५ धावांमध्ये बाद होण्याची
Champions Trophy Final : सुनील गावसकरांना चिंता रोहितच्या २५-३५ धावांमध्ये बाद होण्याची
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) खेळपट्टीवर टिकून राहून फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपान्त्य सामन्यात रोहित ३० धावांवर बाद झाल्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहितच्या रणनीतीची पाठराखण केली होती. ‘तुम्ही खेळाडूला धावांच्या निकषावर तोलता. आम्ही खेळाडूचा सामन्यावरील प्रभाव बघतो,’ असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणाले होते. म्हणजेच सुरुवातीला प्रतिस्पर्धी गोलंदाजांनावर हल्ला करण्याचं काम रोहितवर (Rohit Sharma) दिलेलं आहे. आणि ते तो करत असल्याचं गंभीर यांचं म्हणणं होतं.

त्यावर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी हे विधान केलं आहे. ‘रोहित शर्मा (Rohit Sharma) सारखा फलंदाज २५-३० षटकं मैदानावर टिकला. तर तो सामना प्रतिस्पर्ध्यांकडून खेचून नेईल. या गोष्टीचा विचार होऊन तशी रणनीतीही आखायला हरकत नाही,’ असं गावसकर यांचं त्यावर म्हणणं आहे. त्यामुळे रोहितने (Rohit Sharma) खेळपट्टीवर टिकण्याचा विचार करावा असा त्यांचा सल्ला आहे. (Champions Trophy Final)

(हेही वाचा – Drain Cleaning : जास्त दरात काम मिळवण्याचा डाव फसला; मोठ्या नाल्यांच्या कंत्राटदारांना जुन्याच दराने करावे लागणार काम)

‘मागची दोन वर्षं रोहित (Rohit Sharma) या पद्धतीने खेळतोय. विश्वचषकातही त्याचं हेच धोरण दिसलं होतं. पण, रोहित जर मैदानावर २५-३० षटकं टिकला, तर संघाच्या १८० – २०० धावा सहज या कालावधीत होतील. मग ५० षटकांत ३०० च्या पार जाणं सोपं होऊन जाईल. रोहितचं कौशल्यही असंच आहे की, त्याला न्याय द्यायचा झाल्यास त्याच्या किमान ८०-९० धावा झाल्या पाहिजेत. लय सापडल्यावर त्याने झटपट बाद होता कामा नये,’ असं गावसकर (Sunil Gavaskar) यांचं म्हणणं आहे.

यात गावसकरांना (Sunil Gavaskar) रोहितकडून वैयक्तिक मोठ्या खेळीचीही अपेक्षा आहे. ‘रोहित (Rohit Sharma) सारख्या खेळाडूने २५-३० धावांमध्ये बाद होता कामा नये. त्याचा संघासाठीचा प्रभाव फक्त २०-३० धावांपुरताच नसावा. रोहितने २५-३० षटकं खेळून काढण्याचाही विचार करावा,’ असा गावसकर यांचा सल्ला आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) यंदा चॅम्पियन्स करंडकात आतापर्यंत १०४ धावा केल्या आहेत. कर्णधारपदाच्या बाबतीतही त्याच्यावर सध्या टीका होतेय. आणि चॅम्पियन्स करंडकानंतर एकदिवसीय कर्णधारपद दुसऱ्या खेळाडूला दिलं जाण्यावर संघ प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे. (Champions Trophy Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.