property tax : आता मालमत्ता कर ऑनलाईन स्वरुपात सुध्दा भरता येणार

87
property tax : आता मालमत्ता कर ऑनलाईन स्वरुपात सुध्दा भरता येणार
property tax : आता मालमत्ता कर ऑनलाईन स्वरुपात सुध्दा भरता येणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तब्बल साडेतीन लाखाहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता असून मालमत्ता कर (property tax) भरण्यासाठी सर्व विभाग कार्यालयात सुविधा उपलब्ध आहेत, तसेच ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तथापि नागरिकांना ऑनलाईन कर भरणा करतांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम (BBPS)’ ही नवीन मालमत्ताकर प्रणाली महानगरपालिकेने सुरु केली असून आता नागरिकांना अधिक सहज व सुलभपणे मालमत्ता कर भरणा करणे शक्य होणार आहे. सदर प्रणालीमुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ताकराबाबतचा तपशील, थकीत रक्कम, कर भरण्याचा अंतिम दिनांक आदी माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच यामध्ये काही अडचण जाणवल्यास 022-62531727 हा विशेष हेल्पलाईन क्रमांक सुविधादेखील सुरु केली आहे. (property tax)

‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ प्रणालीमध्ये ‘या’ आहेत पेमेंट पध्दती…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन सध्या विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. मालमत्ताकर भरणा करणे सुलभ व सहज व्हावे याकरिता भारत बिल पेमेंट सिस्टम’(BBPS) ही नवीन प्रणाली सुरु करण्यात आली असून यामध्ये ऑनलाइन बँकिंग, यूपीआय (UPI), क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट्स यासारखे विविध प्रकार/सूची उपलब्ध आहेत. नागरिक nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून तसेच My NMMC या ॲपवरून घरबसल्या करभरणा करू शकतात. सदर प्रकारांच्या वापरामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या सोयीप्रमाणे कुठूनही ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा करता येणार असून त्यांना कराचा भरणा केलेली पावती तात्काळ उपलब्ध होणार आहे. नविन पेमेंट प्रणालीमुळे नागरिकांना करसंकलनाच्या विभागीय कार्यालयामध्ये जावे लागणार नसून नागरिकांच्या वेळेची बचत होऊन पेमेंट प्रक्रियेमध्ये सुलभता येणार आहे. (property tax)

ऑनलाईन पेमेंटची प्रक्रिया असेल सुरक्षित…
मालमत्ताकर विभागाने अवलंब केलेल्या ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असून ती पूर्णत: सुरक्षित आहे. यामध्ये मालमत्ताधारकाची आर्थिक व व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहणार असून मालमत्ताधारकांना एकाच क्लिकवर विविध प्रकारे मालमत्ताकर भरण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर, माहितीच्या विश्लेषणाच्या माध्यमातून देय रकमांच्या व्यवस्थापनामध्ये अचूकता येणार आहे व अधिकाधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. (property tax)

मालमत्ता कराबाबत विशेष ‘हेल्पलाईन’ कार्यान्वित; सुट्टीच्या दिवशीसुध्दा होणार तक्रारींचे निराकरण…
मालमत्ताधारकांना मालमत्ता करासंदर्भातील तक्रारींचा निपटारा, शंकाचे निरसन व मालमत्ताकराबाबतची इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी 022-62531727 हा विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सोमवार ते रविवार, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून आपल्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन मालमत्ता कर विभागाकडून करण्यात येत आहे. (property tax)

नागरिकांनी ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ (BBPS)चा वापर करुन मालमत्ताकर भरण्याचे आयुक्तांचे आवाहन !
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ताकराचा भरणा सहजपणे करता यावा व त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ (BBPS) या पेमेंट प्रक्रियेचा मालमत्ताकर विभागाने अवलंब केला आहे. या नव्या प्रणालीमध्ये जुन्या प्रणालीमधील सर्व त्रुटी दूर करण्याकडे विशेष लक्ष दिल्याने ऑनलाईन कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ व जलद झालेली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्यासाठी महापालिका कार्यालयांमध्ये जाण्यासाठी वेळ घालविण्याची गरज भासणार नाही. त्यांना घरबसल्या आपल्या मालमत्ताकराचा भरणा करता येईल व त्याची पावतीही ऑनलाईन उपलब्ध होईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता मालमत्ताकर विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून नागरिकांनी जागरुकपणे आपल्या कराचा वेळच्या वेळी भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. (property tax)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.