Bangladesh Infiltrators : ठाणे येथे पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहिल्याच्या आरोपाखाली दोन बांगलादेशी महिलांना (Infiltrator Bangladeshi women) अटक केली आहे. या आरोपी महिलांना फ्लॅट भाड्याने दिल्याबद्दल पोलिसांनी आणखी दोघांनाही अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. (Bangladesh Infiltrators)
(हेही वाचा – China : दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक ! चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान)
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना बेकायदेशीरपणे देशात राहिल्याबद्दल आणि त्यांना फ्लॅट भाड्याने देणाऱ्या दोन पुरुषांना अटक केली आहे. गुरुवारी अंबरनाथच्या अडवली-ढोकली (Ambernath Adawali-Dhokli) भागातील एका गृहनिर्माण संकुलात छापा (Police Raid in housing complex) टाकताना या महिलांना पकडण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
फरजाना शिरागुल शेख (३६) आणि बिथी उर्फ प्रिया नूरइस्लाम अख्तर (२४) अशी या महिलांची नावे आहेत. तर या महिला दोन्ही देशांमध्ये प्रवासासाठी आणि राहण्यासाठी ठोस कागदपत्रे सादर करू शकली नाही. पोलिसांनी ताहिर मुनीर अहमद खान (३५) आणि गणेश चंद्र दास (३७) यांनाही अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचा – Nepal ची अर्थव्यवस्था डगमगली; कर्ज वाढले अमेरिकेने आर्थिक मदतही रोखली)
दरम्यान या प्रकरणात पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्यांतर्गत महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तसेच, हे लोक देशात कसे घुसले याचा तपास केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांमधून अनेक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community