International Women’s Day : पुरुषांपाठोपाठ आता नोकऱ्यांमध्ये महिलांचा ‘टक्का’ वाढला; गतवर्षीच्या तुलनेत ४८ टक्के वाढ

44
महिलांचा वावर आता प्रामुख्याने सर्वच क्षेत्रात ठळक पणे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत महिलांच्या रोजगारामध्ये ४८ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. नवोदित युवतींना रोजगाराच्या संधी (Employment opportunities for women) पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तसेच वेळेप्रसंगी महिलांही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पाडताना दिसत आहेत. तसेच महिलांना (women) रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत आहेत.    (International Women’s Day)

नवोदित युवतींच्या रोजगारात २५ टक्क्यांनी वाढ
नवोदित युवतींच्या रोजगाराच्या संधीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः मनुष्यबळ विकासमंत्री, मानव संसाधन, आणि विपणन यासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.
३ वर्षांपर्यंत अनुभव असणार्‍यांना प्राधान्य
० ते ३ वर्षापर्यंत अनुभव असणार्‍या ५३ टक्के युवतींना नोकर्‍यांमध्ये खास संधी उपलब्ध होत आहेत. ४ ते ६ वर्षांचा अनुभव असणार्‍या ३२ टक्के महिलांनाही अनेक क्षेत्रांतून मागणी वाढत आहे. सॉफ्टवेअर, माहिती-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत तर महिलांचेही वर्चस्व आहे.

(हेही वाचा – ९ ते १५ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या Cancer वरील लस मिळणार मोफत)

जाहिरात, इव्हेंटमध्येही सहभाग
भरती, स्टाफिंग आणि जाहिरात, इव्हेंटस् आदी क्षेत्रांमध्येही महिलांसाठी नोकरीच्या संधी वाढत आहेत. भारतीय नोकरी बाजार वेगाने विकसित होत आहे, ज्यामुळे विशेषतः उच्च-वाढ क्षेत्रे आणि तंत्रज्ञान-संचालित भूमिकांमध्ये महिलांसाठी अधिक प्रवेश, संधी निर्माण होत आहेत.
सहभाग उत्साहवर्धक
वेतन समता आणि विकसित होत असलेल्या कामाच्या पद्धतींमध्ये अजूनही आव्हाने आहेत, तरीही २०२५ मध्ये महिलांच्या कार्यबल सहभागाबाबतचा एकूणच द़ृष्टिकोन खूपच उत्साहवर्धक आहे.
एआय, सायबर सुरक्षेतही आघाडी
अभियांत्रिकी आणि उत्पादन भूमिकांमध्येही महिलांचा सहभाग वाढत आहे, जो गेल्या वर्षी ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. या वाढीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये विशेष प्रतिभेची वाढती गरज अधोरेखित होते.

(हेही वाचा – Champions Trophy Final : भारतीय संघाचा दुबईत जोरदार सराव, दुबईची खेळपट्टी कशी असेल?)

छोट्या-मोठ्या शहरांत संधी
महिलांना टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये नोकर्‍या मिळत आहेत. नाशिक, सुरत, कोयंबटूर आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये महिलांच्या नोकर्‍यांचा वाटा ४१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर टियर-१ शहरांमध्ये तो ५९ टक्के आहे.
वार्षिक १० लाखांपासून २५ लाखापर्यंत वेतन
महिलांच्या नोकर्‍यांसाठी वेतन वितरण पाहता, बहुतांश (८१ टक्के) नोकर्‍या वार्षिक ०-१०  लाखांच्या वेतन श्रेणीत येतात. त्यानंतर ११ टक्के नोकर्‍या ११-२५  लाखांच्या श्रेणीत येतात, तर ८ टक्के महिला २५ लाखांहून अधिक कमावत आहेत.

(हेही वाचा – ST महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक)

बँकिग, आयटीमध्ये सर्वाधिक संधी
माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, वित्तीय सेवा, उत्पादन, आरोग्य आदी क्षेत्रांत महिलांना रोजगाराच्या प्रचंड संधी (Employment opportunities) उपलब्ध होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानात महिलांची भूमिका निर्णायक ठरत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.