1 of 8

डिजिटल शिक्षिका आणि YouTuber यशोदा लोधी यांना देहाती मॅडम म्हणून ओळखले जाते. ‘देहाती मॅडम’ यूट्यूब चॅनेलद्वारे इंग्रजी शिकवतात. या चॅनेलचे लाखो फॉलोअर्स आहेत. ग्रामीण भागात आजही मुलींना शिक्षण देण्याकडे लक्ष दिले जात नसताना त्या त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पती रोजंदारीवर काम करत होते. २०१९ मध्ये झालेल्या अपघातामुळे त्यांचे काम थांबले. यानंतर यशोदा यांनी मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी २०२१ मध्ये यूट्यूबवर देहाती मॅडम नावाचे चॅनेल सुरू केले. त्यांचे व्हिडिओ ३ कोटी वेळा पाहिले गेले. आज त्या दरमहा ८० ते ९० हजार रुपये कमावतात. (International Womens Day)

डायना पुंडोले ही पहिली महिला रेसिंग चॅम्पियन आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किटला झालेल्या सलून प्रकारात एमआरएफ यामुळे यांच्याकडे लक्ष : कार रेसिंगच्या वेगवेगळ्या फाॅरमॅटमध्ये नशीब आजमावून पाहण्याची तयारी करत आहेत. नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले. असे करणाऱ्या देशातील पहिल्या महिला. डायना पुंडोले यांनी पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या रेसिंगमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवून सर्वांना चकित केले. चेन्नईत झालेल्या एमआरएफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी डायना एकमेव भारतीय महिला आहे. तिने युरोप व संयुक्त अरब अमिरातीतील जगप्रसिद्ध रेसिंग ट्रॅकवर रेसिंग कारही चालवल्या आहेत, त्यात फॉर्म्युला वन आणि दुबई ऑटोड्रोमचा समावेश आहे. त्या व्यवसायाने शिक्षिका व दोन मुलांची आई आहेत. (International Womens Day)

स्नेहा रेवानूर जगातील टॉप १०० एआय तज्ञांमध्ये समाविष्ट आहे. टाइम मासिकाने २०२३ मध्ये एआय क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये समावेश केला. ३० देशांतील ८०० तरुण सदस्य या संघटनेत सामील झाले आहेत. ती लोकांना एआयच्या गैरवापराबद्दल जागरूक करत आहे. (International Womens Day)

सूर्या मिशन यशस्वी करणाऱ्या आदित्य एल-१ च्या प्रकल्प संचालक निगार शाजी यांनी भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नेतृत्व केले आहे. निगार शाजी इस्रोच्या विविध उपग्रह कार्यक्रमांवर आणि वेगवेगळ्या ग्रहांशी संबंधित मोहिमांवर काम करत आहेत. निगार शाजी १९८७ मध्ये इस्रोच्या यू.आर. राव उपग्रह केंद्रात सामील झाल्या. गेल्या ३८ वर्षांपासून इस्रोत आहेत. शुक्र मोहिमेसाठी अध्ययन संचालक म्हणून काम केले. आदित्य एल १ मिशनच्या प्रकल्प संचालक म्हणून शाजी व त्यांच्या टीमने ८ वर्षे काम केले. आदित्य-एल १ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे पहिलेच मिशन आहे. (International Womens Day)

मोहना सिंग जितरवाल, 'तेजस' लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक आहे. सध्या हवाई दलात लढाऊ विमाने चालवणाऱ्या फक्त २० महिला वैमानिक आहेत. नवीन पिढीसाठी मोहना प्रेरणा आहेत. (International Womens Day)

अंशुला कांत यांचा २०२४ मध्ये फोर्ब्स इंडिया पॉवर लिस्ट ऑफ सेल्फमेड वुमनमध्ये समावेश करण्यात आला होता. अंशुला २०३० पर्यंत गरिबी निर्मूलनासाठी काम करत आहेत. १९८३ मध्ये, अंशुला यांनी एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. येथे ३६ वर्षे काम केले आणि व्यवस्थापकीय संचालक बनल्या. २०१९ मध्ये, त्या जागतिक बँकेच्या पहिल्या महिला एमडी, सीएफओ बनल्या. (International Womens Day)

मंगलाबाई मरावी यांचे आदिवासी टॅटू ऑस्ट्रेलियातील सिडनीत प्रदर्शित झाले आहेत. बैगा व गोंड जमातींच्या टॅटू कला जतन करण्यासाठी काम करत आहेत. जागतिक पातळीवर या कलेला मान्यता मिळवून देत आहेत. त्या टॅटू बनवताना कोणत्याही प्रकारचे रसायन वापरत नाहीत. (International Womens Day)

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माती पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ला कान्समध्ये ग्रांड प्रिक्स पुरस्कार मिळाला. मुंबईवर आधारित आणखी एका विशेष चित्रपटावर काम करत आहेत. त्यांना या विषयावर तीन चित्रपट बनवायचे आहेत. पायल पुण्यातील एफटीटीआयच्या विद्यार्थिनी आहेत. ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या लघुपटाने ग्रांड प्रिक्स मिळवला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी चित्रपटांचे नामांकन होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला दिग्दर्शक आहेत. (International Womens Day)