Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये पहिले दोन आठवडे खेळणार नाही?

मुंबईच्या ताफ्यात तो एप्रिल महिन्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

52
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये पहिले दोन आठवडे खेळणार नाही?
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये पहिले दोन आठवडे खेळणार नाही?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुनरागमनसाठी आणखी एक महिना घेऊ शकतो. त्यामुळे आयपीएलचे (IPL) पहिले दोन आठवडे तो खेळणार नाही, असंच सध्या दिसतंय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होऊ शकेल. सध्या तो बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या दुखापतीतून सावरण्यावर मेहनत घेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहची (Jasprit Bumrah) पाठ दुखावली होती. त्याला शस्त्रक्रियेची गरज नसली तरी व्यायामावर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. सुरुवातीला त्याला दोन आठवड्यांची बेडरेस्ट सांगण्यात आली होती.

‘बुमराह बंगळुरूमध्ये नेट्समध्ये गोलंदाजी करतोय. त्याचे वैद्यकीय चाचणी अहवालही ठिक आहेत. पण, अगदी पंधरा दिवसांत तो पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करणं काहीसं अवघड आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये (IPL) खेळण्यासाठी एप्रिलची वाट पाहावी लागेल,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी वृत्तसंस्थांना सांगितलं आहे. २२ मार्चपासून आयपीएलचा (IPL) नवीन हंगाम सुरू होत आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, बुमराह (Jasprit Bumrah) मुंबईकडून पहिले ३ ते ४ सामने खेळणार नाही.

(हेही वाचा – एटीएस ते गुन्हे पोलीस निरीक्षक… आव्हानात्मक क्षेत्रात तडफदार कामगिरी बजावणाऱ्या PI Deepali Kulkarni)

भारतीय संघ आयपीएलनंतर (IPL) महत्त्वाच्या इंग्लिश दौऱ्यासाठी जाणार आहे. आणि तिथे बुमराहने (Jasprit Bumrah) तंदुरुस्त असणं ही संघाची महत्त्वाची गरज असेल. रोहीत शर्मा इथून पुढे कसोटी खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतीय गोटातून ज्या बातम्या पसरत आहेत, त्यानुसार, अगदी इंग्लंड दौऱ्यातही रोहीत कर्णधार राहणार नाही. आणि तो आधीच निवृत्तीही स्वीकारेल. अशावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा कर्णधार पदासाठीही शर्यतीत असेल. त्याच्या तंदुरुस्तीवर हा निर्णय अवलंबून असेल. आयपीएल (IPL) इतकीच इंग्लिश दौऱ्याची चर्चा भारतात सध्या सुरू आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) दोघंही या दौऱ्यासाठी तंदुरुस्त असतील तर भारतीय गोलंदाजी भक्कम दिसेल. त्यांच्याबरोबर महम्मद सिराजही संघात जागा कायम राखू शकतो. चौथा तेज गोलंदाज म्हणून आकाशदीप आणि हर्षित राणा (Harshit Rana) यांच्यात चुरस असेल. तर अर्शदीप आणि मुकेश कुमारही (Mukesh Kumar) शर्यतीत असतील. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय अ संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्या दौऱ्यातील कामगिरीवरूनही भारतीय संघाचं चित्र स्पष्ट होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.