कुलभूषण जाधवांना पकडून देणाऱ्या ISI च्या एजंटचा खात्मा

मुफ्ती शाह मीरने ISI च्या सांगण्यावरून अफगाणिस्तानातही त्याचा तळ ठोकला होता. तो स्वत:ला एक दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानात वावरायचा आणि गुप्त माहिती पाकिस्तानी फौजेला द्यायचा.

121

पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेच्या एजंटने भारतीय सैन्य अधिकार कुलभूषण जाधव यांना पकडून दिले होते. त्या एजंटचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुफ्ती शाह मीर असे या एजंटचे नाव आहे. त्याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले.

हा ISI चा एजंट बलूचिस्तानच्या तुरबत परिसरात राहत होता. हा मुफ्ती शाह मीर ISI च्या इशाऱ्यावरून लोकांना बेकायदेशीरपणे एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याचे काम करायचा. यामाध्यमातून तो दृग्ज आणि अवैध हत्यारांची तस्करीही करायचा. मुफ्ती शाह मीर पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी ISI ट्रेनिंग सेंटरमध्ये ये जा करायचा. त्याचे आणखी एक काम होते, तो पाकिस्तानातून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करायचा.

(हेही वाचा विधीमंडळ परिसरात महान महिलांच्या प्रतीमा उभारा; आमदार Sreejaya Chavan यांची मागणी)

मुफ्ती शाह मीरने ISI च्या सांगण्यावरून अफगाणिस्तानातही त्याचा तळ ठोकला होता. तो स्वत:ला एक दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानात वावरायचा आणि गुप्त माहिती पाकिस्तानी फौजेला द्यायचा. त्याला बलूचिस्तानमधील स्वातंत्र्यासाठी चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ठार केल्याचे समजते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.