Rajasthan मधील चर्च बनले भैरवनाथ मंदिर; ख्रिस्ती धर्मियांनी केली हिंदू धर्मात घरवापसी

168
Rajasthan मधील चर्च बनले भैरवनाथ मंदिर; ख्रिस्ती धर्मियांनी केली हिंदू धर्मात घरवापसी
Rajasthan मधील चर्च बनले भैरवनाथ मंदिर; ख्रिस्ती धर्मियांनी केली हिंदू धर्मात घरवापसी

राजस्थानमधील (Rajasthan) बांसवाडा (Banswara) जिल्ह्यात एका चर्चचे हिंदू (Hindu) मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. या गावातील लोकांनी काही वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्याचवेळी गावात चर्च बांधण्यात आले होते. आता जवळजवळ संपूर्ण गाव हिंदू (Hindu) झाले आहे. यानंतर गावकऱ्यांनी चर्चचे मंदिरात रुपांतर केले आहे. चर्चचे मंदिरात रूपांतर केल्यानंतर, त्यात भैरवजींची मूर्ती स्थापित केली जाणार आहे.

( हेही वाचा : विधीमंडळ परिसरात महान महिलांच्या प्रतीमा उभारा; आमदार Sreejaya Chavan यांची मागणी

हे चर्च बांसवाडा (Banswara) जिल्ह्यातील गंगारदतली येथील सोदलादुधा गावाचे आहे. भारत माता मंदिर प्रकल्पाच्या काही दिवस आधी, या गावातील ८० कुटुंबांनी घरवापसी करत हिंदू (Hindu) धर्म स्वीकारला आहे. घरी परतल्यानंतर गावातील कुटुंबांनी भैरवनाथ मंदिर (Bhairavanath Temple) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दि. ९ मार्च रोजी निश्चित करण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गावातील गौतम गरसिया (Gautam Garcia) नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की त्याने ३० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तेव्हा गावात धर्मांतर करणारा ते पहिले व्यक्ती होते. यानंतर, त्याच्या कुटुंबातील ३० सदस्यांनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांच्या प्रेरणेने इतर काही लोकांनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. परंतु त्याचवेळी धाकट्या भावाचे कुटुंब हिंदू (Hindu) राहिले.

माहितीनुसार, गौतम (Gautam Garcia) म्हणतात की त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर, ख्रिश्चन समुदायातील लोक त्याच्या गावाला भेट देऊ लागले. गौतम (Gautam Garcia) दर रविवारी त्यांच्या घरात प्रार्थना सभा घेऊ लागले. यानंतर, त्यांच्या वडिलांना त्यांच्या झोपडीवजा घराचे चर्चमध्ये रूपांतर करण्यासाठी पैसे देण्यात आले. जेव्हा झोपडी चर्च बनली तेव्हा बाहेरून पाद्रीही तिथे येऊ लागले.

त्याने गावातील इतर लोकांनाही ख्रिस्ती होण्यासाठी प्रेरित करायला सुरुवात केली. ते प्रार्थना सभेला येणाऱ्या गावकऱ्यांनाही दान करण्यास सांगायचा. त्यांनी गावकऱ्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासही सांगितले. या लोकांनी गौतमला या गावातील चर्चचा पाद्रीही बनवले. त्या बदल्यात त्याला दरमहा सुमारे १५०० रुपये दिले जात होते. गौतमचे (Gautam Garcia) दोन्ही मुलांनी घरवापसी केली आहे, तर गौतम त्यांची पत्नी अजूनही ख्रिश्चन आहेत. त्यांनी सांगितले की, गावातील ४५ लोकांपैकी ३० जणांनी पुन्हा हिंदू (Hindu) धर्म स्वीकारला आहे. उर्वरित १५ लोकही लवकरच घरवापसी करतील असा दावा त्यांनी केला आहे. घरवापसी करणाऱ्यांचे म्हणणे आहे की ते सध्या ख्रिश्चन असलेल्यांना हिंदू (Hindu) धर्म स्वीकारण्यास पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.