Rajasthan मध्ये ख्रिस्ती धर्मांतराचा कट हिंदू संघटनांनी उधळला; १५० आदिवासींचे धर्मांतरासाठी ब्रेनवॉश

59
Rajasthan मध्ये ख्रिस्ती धर्मांतराचा कट हिंदू संघटनांनी उधळला; १५० आदिवासींचे धर्मांतरासाठी ब्रेनवॉश
Rajasthan मध्ये ख्रिस्ती धर्मांतराचा कट हिंदू संघटनांनी उधळला; १५० आदिवासींचे धर्मांतरासाठी ब्रेनवॉश

राजस्थानमध्ये (Rajasthan) हिंदूच्या धर्मांतराचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. भरतपूर आणि बांसवाडा (Banswada) नंतर आता सिरोही जिल्ह्यात धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील रेवदार तहसीलमध्ये सुमारे १५० आदिवासी लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्यात आले आहे. धर्मांतराची माहिती मिळताच हिंदू (Hindu) संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. तसेच त्यांनी घटनास्थळी आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा : प्रत्यक्ष न्यायदानातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग; डॉ. D. Y. Chandrachud यांचे प्रतिपादन

दि. ६ मार्च रोजी रात्री १० वाजता रेवदारच्या करोती येथील अन्वर नागौरी यांच्या विहिरीजवळ एका प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या आदिवासी समुदायातील १५० हून अधिक लोकांना आमिष दाखवून यामध्ये बोलावण्यात आले. त्यापैकी बहुतेक महिला होत्या. या सर्व लोकांना फसवून ख्रिस्ती धर्मातर धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला जात होता.

दरम्यान, यासंदर्भात कोणीतरी विश्व हिंदू परिषद (Vishva Hindu Parishad) आणि बजरंग दलाला (Bajrang Dal) याबद्दल माहिती दिली. जेव्हा हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रार्थना सभा आयोजित करणाऱ्या लोकांना विचारपूस केली तेव्हा ते म्हणाले, “आम्ही आदिवासी लोकांना आजारातून मुक्त करतो. आम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही.” लाऊडस्पीकरबद्दल विचारले असता ते म्हणाले, “आमच्यावर कोणताही कायदा लागू होत नाही.” असे ते लोक म्हणाले. (Hindu)

या लोकांनी हिंदू (Hindu) संघटनेच्या कार्यकर्त्यांशीही भांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चार जणांना ताब्यात घेतले. त्याच वेळी, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून बायबल आणि इतर ख्रिश्चन पुस्तकेही जप्त करण्यात आली. (Rajasthan)

एएसआय रमेश दान चरण (Ramesh Dan Charan) यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या चार जणांची ओळख पटली आहे. त्यांची नावे गजेंद्र खरारी (Gajendra Kharari), निचली सिगरी येथील रहिवासी, ललित आणि लंकेश, करेल (उदयपूर) आणि भर्मा राम, झमार (आबू रोड) अशी आहेत. ते सर्वजण तिथे पोहोचलेल्या लोकांना हिंदू (Hindu) धर्माबद्दल दिशाभूल करणारी माहिती देत ​​होते. या लोकांवर कारवाई झाल्यामुळे आदिवासी समुदाय संतप्त झाला आणि रात्री पोलीस ठाण्याबाहेर जमला. अटक केलेल्यांची सुटका करण्याची मागणी करताना ते म्हणाले, “जर त्यांना सोडले नाही तर आम्ही अन्न कसे खाणार? आमच्याकडे फक्त दोनच देव आहेत – एक देव आणि दुसरा ते लोक जे पोलिस स्टेशनमध्ये बंद आहेत. (Rajasthan)

तथापि, खूप समजावल्यानंतर पोलिसांनी त्या लोकांना त्यांच्या घरी परत पाठवले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक आदिवासी महिला म्हणत आहे की, “आमच्या घरातील लोक दारू पिऊन नाल्यात पडायचे. त्यावेळी कोणीही भेटायला आले नव्हते पण आता प्रभूच्या कृपेने त्यांनी सर्वांनी व्यसने सोडले आहेत.”, असे लोक म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.