-
प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षसंघटनेच्या तयारीला लागला आहे. पक्षाची निवडणूकपूर्व तयारी जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी मुंबईत शिवसंवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याअंतर्गत आज अंधेरी येथे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.
अंधेरीतील बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा
शनिवारी अंधेरीतील मातोश्री क्लब येथे झालेल्या बैठकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांसोबत पक्षसंघटनेची स्थिती, आगामी रणनीती आणि कार्यकर्त्यांचे संघटन याविषयी चर्चा झाली. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून प्रभागनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अहवाल तयार करून तो पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी दिली.
(हेही वाचा – महिलांनी संरक्षणासाठी काय करावे? मंत्री Gulabrao Patil म्हणाले… )
शिवसंवाद दौऱ्याचा पक्षाला फायदा
यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ६३ मतदारसंघात घेतलेल्या जनसंवाद दौऱ्याचा पक्षाला कसा फायदा झाला, याचा उल्लेख केला. अशाच प्रकारे महापालिका निवडणुकीतही स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात रविवारी बैठक
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून रविवार, ९ मार्च रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
(हेही वाचा – Rajasthan मधील चर्च बनले भैरवनाथ मंदिर; ख्रिस्ती धर्मियांनी केली हिंदू धर्मात घरवापसी)
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला खासदार रविंद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मुरजी पटेल, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, पक्ष सचिव किरण पावसकर, भाऊसाहेब चौधरी, सिद्धेश कदम, उपनेते संजय निरुपम, उपनेत्या शीतल म्हात्रे, कला शिंदे आणि शायना एनसी यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसंवाद दौऱ्यातून महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचे संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे. पक्षाची रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क साधला जाणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community