मागील काही दिवसांपासून शांततेकडे वाटचाल करणाऱ्या मणिपूर (Manipur) राज्यात दि. ८ मार्च रोजी पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे. राज्यातील वाहतूक सुरळीत करण्याच्या आदेशाची अंमलबजावणीनंतर पहिल्याद दिवशी इम्फाळ-दिमापूर महामार्गावर (Imphal-Dimapur Highway) कुकीसमुदायाच्या सदस्यांमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू झाला असून, २७ सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे.
( हेही वाचा : Women : दाम्पत्याला दोन महिलांनी ठार मारण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल)
केंद्रीय गृहंमत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या आदेशानंतर दि. ८ मार्चपासून मणिपूरमधील (Manipur) सर्व रस्त्यांवर लोकांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. इम्फाळहून (Imphal) सेनापतीकडे जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्याला कुकीबहुल भागात थांबवण्यात आल्याने तणाव वाढला. सुरक्षा दलांनी हस्तक्षेप केला आणि सौम्य बळाचा वापर केला. त्यात कानपोक्पीमध्ये, विशेषतः राष्ट्रीय महामार्ग २ च्या बाजूच्या भागात तणाव वाढल्याने, स्थानिक अधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केला आहे. तसेच सरकारी वाहनांच्या हालचालीत अडथळा आणण्यासाठी टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग २ (इम्फाळ-दिमापूर महामार्ग) रोखणाऱ्या संतप्त निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तथापि, निदर्शकांनी खाजगी वाहनांना आग लावण्यास सुरुवात केली आणि सेनापती जिल्ह्यात जाणाऱ्या राज्य परिवहन बसला थांबवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
मणिपूरमध्ये (Manipur) सुमारे दोन वर्षांपासून मेइतेई आणि कुकी समुदायाच्या (Kuki people) संघर्षात २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांनी इम्फाळ ते कांगपोक्पी आणि चुराचंदपूर अशी सार्वजनिक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी झाला होता. त्यानंतर दि. ८ मार्च रोजी पुन्हा एकदा राज्यातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या मार्गावर, इम्फाळ ते कांगपोक्पी जिल्हा मार्गे सेनापती आणि दुसऱ्या मार्गावर, इम्फाळ ते बिष्णुपूर मार्गे चुराचंदपूर या बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. (Manipur)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community