-
खास प्रतिनिधी
महायुतीचा सरकार २.० चा २०२५-२६ आर्थिक वर्षांचा पहिला अर्थसंकल्प, सोमवारी १० मार्च २०२५ या दिवशी, विधीमंडळात सादर केला जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने कोणत्याही नव्या योजना किंवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (State Budget)
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
जून २०२४ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी पुढील ३-४ महिन्यात झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला महिलांनी भरभरून मतदान केले आणि अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले. लाडकी बहीण योजनेसोबतच अन्य काही लोकप्रिय घोषणांचा पाऊस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केला. मात्र लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करण्याचा विचार राज्य शासनाचा नाही, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. (State Budget)
(हेही वाचा – Women : दाम्पत्याला दोन महिलांनी ठार मारण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल)
तिजोरीवर आर्थिक भार
निवडणूक वर्षात झालेल्या खर्चामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आणि त्याचा परिणाम अन्य योजनांवर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या वर्षी कोणत्याही नव्या योजना किंवा घोषणा करण्यात येणार नाहीत. त्याऐवजी सुरू असलेले प्रकल्प, योजना तशाच पुढे सुरू ठेवण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (State Budget)
स्थानिक निवडणुका लांबणीवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने मुंबई-पुणे-नागपूरसह २९ महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता असल्याने हा सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून जनतेने फार अपेक्षा ठेवल्या नसल्याचे दिसून येत आहे. (State Budget)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community