संभल (Sambhal) येथे दंगलखोरांनी पोलिसांवर फेकलेले दगड आता पोलीस चौक्या बांधण्यासाठी वापरले जात आहेत. मुसलमान दंगलखोरांनी हिंसाचार केलेल्या संभलमध्येच या दगडांपासून एकूण ३८ पोलीस चौक्या बांधल्या जात आहेत. संभलमध्ये पोलिसांवर हल्ले करणारे दंगलखोर आता जामिनासाठी न्यायालयात फेर्या मारत आहेत; मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
संभल (Sambhal) चे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार म्हणाले, दंगलखोरांनी फेकलेल्या दगडांचा वापर करून पोलीस चौक्यांचा पाया रचला जात आहे. प्रशासनाच्या साहाय्याने पोलिसांनी ‘सेफ संभल’ (सुरक्षित संभल) नावाचा प्रकल्प जिल्ह्यात राबवणे चालू केले आहे. त्यामध्ये ३ कोटी रुपये खर्चून अनेक चेहरे ओळखणारे कॅमेरे बसवले जात आहेत. संभल (Sambhal) मध्ये आतापर्यंत असे ६०० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही व्यक्तीची ओळख पटण्यास साहाय्य होईल.
(हेही वाचा Madhya Pradesh मध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा; ‘या’ राज्याने घेतला कठोर निर्णय)
५ मार्च २०२५ या दिवशी १४ दंगलखोरांनी संभल (Sambhal) न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यांपैकी ४ जणांच्या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली, तर १० दंगलखोरांचे जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी संभल (Sambhal) येथील शाही जामा मशिदीतील सर्वेक्षणाच्या वेळी इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंसाचार केला होता. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करत अनेक वाहनांची तोडफोड केली होती.
Join Our WhatsApp Community